जगन्नाथ मंदिर पंधरा मे पर्यंत बंद, कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे प्रशासनाने घेतला निर्णय


विशेष प्रतिनिधी

भुवनेश्वर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिर येत्या १५ मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. यादरम्यान मंदिरात नियमित पूजा कोविडचे नियम पाळून सुरु राहतील, असे स्पष्ट करण्यात आले.Jaganath Temple closed till 15 may

यावर्षी १५ मे अक्षय तृतीयेच्या दिवशी रथयात्रेशी निगडीत काम परंपरेनुसार सुरू केले जाणार आहे. सेवकांसाठी मास्क आणि सॅनिटायझरची व्यवस्था केली जाणार जाईल.



सेवकांच्या मते, जगन्नाथ मंदिरात येण्यास भक्तांना मनाई केली जात असेल तर आगामी काळातील रथयात्रा नियोजनबद्ध रीतीने आयोजित केल्या जातील.कोरोनाची दुसरी लाट पाहता श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाने व्हिडिओ कॉन्फरसिंग आयोजित केली होती.

या बैठकीत कोरोना संसर्गामुळे निर्माण झालेल्या अडचणींवर चर्चा करण्यात आली. राज्यात आणि देशात कोविडचा प्रसार वेगाने होत असून अशा स्थितीत जगन्नाथ मंदिर सुरू ठेवले तर भविष्यात त्याचे परिणाम दिसू लागतील.

त्यामुळे सर्वांनी जगन्नाथ मंदिर बंद ठेवण्याचा सल्ला दिला. या वेळी जगन्नाथ मंदिर येथे नियमित सेवा करणाऱ्या सेवकांच्या आरोग्याबाबत चर्चा करण्यात आली. दुसरीकडे रथ तयार करण्याचे काम सुरू ठेवण्याचे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Jaganath Temple closed till 15 may

महत्त्वाच्या बातम्या

 

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात