VIDEO : पंतप्रधानांनी जेव्हा चिमुकल्यांना विचारले, तुम्ही मोदींना ओळखता का? त्यावर मिळाले ‘हे’ उत्तर

पंतप्रधान मोदी आणि लहान मुलांमधील संभाषणाचा  हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी अखिल भारतीय शैक्षणिक परिषद 2023 च्या उद्घाटन समारंभात पोहोचले, जिथे ते पूर्णपणे वेगळ्या मूडमध्ये दिसले. पंतप्रधान नरेंद्र मोदी तेथे आयोजित एका प्रदर्शनात लहान मुलांना भेटले आणि त्यांच्याशी खूप गप्पा देखील  मारल्या. मुलांनीही पंतप्रधान मोदींना मिठी मारली आणि त्यांच्यासोबत फोटो काढले.  When PM Modi himself asked the children Do you know Modi

पंतप्रधान मोदींनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून मुलांसोबतच्या संभाषणाचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, निरागस मुलांसोबतचे काही आनंदाचे क्षण. त्यांची ऊर्जा आणि उत्साहामुळे मन प्रफुल्लित होते. व्हिडिओमध्ये मोदींना भेटल्यानंतर मुले खूप आनंदी दिसत आहेत. काही मुले धावत जाऊन मोदींनी मिठी देखील मारतात आणि त्यांच्याबद्दल खूप काही बोलतात. व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी आणि मुलांमधील संभाषणही दिसते.

https://www.youtube.com/shorts/wDcArxY6Rns

पंतप्रधान मोदी जेव्हा आले तेव्हा मुलांनी धावत त्यांच्याजवळ जाऊन नमस्ते मोदीजी असे म्हणत प्रेमाने स्वागत केले. यावर मोदींनीही मुलांना जवळ घेत नमस्ते… नमस्ते… म्हणत त्यांचे स्वागत स्वीकरले. यानंतर मोदी जेव्हा मुलांना विचारतात की तुम्ही मोदीजींना ओळखता का? तेव्हा मुल होय म्हणतात, एकजण म्हणतो मी तुमचा व्हिडिओ टीव्हीवर पाहिला आहे. तेव्हा मोदी विचारतात मी टीव्हीवर काय करत होतो, टीव्हीवर तुम्ही काय पाहिले? तेव्हा मुलगा म्हणतो मी तुमचा फोटो टीव्हीवर पाहिला. याचबरोबर मोदींनी पुन्हा विचारले तुम्ही इथे काय करत आहात?  तेव्हा मुलांनी मोदींना ते काय करत आहेत हे दाखवण्यासाठी नेले आणि म्हटले की मोदीजी आम्ही इथे पेंटिंग करतोय. पंतप्रधानांनी विचारले तुम्ही कोणता रंग घेतला आहे? तेव्हा  मुलगा म्हणाला लाल आणि एका मुलाने मोदींजवळ जाऊन मोदीजी, तुम्ही आमच्यासोबत एक फोटो काढाल का असेही विचारले, तेव्हा मोदींनी त्याला प्रेमाने जवळ घेतल होकार दिला.

When PM Modi himself asked the children Do you know Modi

महत्वाच्या बातम्या 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात