विशेष प्रतिनिधी
कोलकता : सिनेमा वेगळा आणि प्रत्यक्ष राजकारण वेगळे याचा प्रत्यय आता प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना येवू लागला आहे. नुकत्याच झालेल्या पश्चिचम बंगालमधील विधानसभा निवडणूक प्रचारात त्यांनी भावनेच्या भरात आपल्या सिनेमांतील निवडक संवाद जोशात म्हटले खरे. पण आता त्या चिथावणीखोर भाषणांवरून मिथुनदा यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे. West Bengal Police started investigation of Mithun
चक्रवर्ती यांची कोलकता पोलिसांनी बुधवारी चौकशी केली. मिथुन यांनी भाजपच्या प्रचारसभेत त्यांच्या बंगाली चित्रपटातील प्रक्षोभक संवादांचा वापर भाषणात केला होता. ‘मार्बो एखने, लाश पोर्बे साशने’ (आम्ही तुम्हाला येथे मारु आणि तुमचे शव स्मशानभूमीत दिसेल) असे अशी संवादफेक त्यांनी केली होती. तसेच ‘एक छोबेले चोबी’ म्हणजे एका सर्पदंशाने तुम्ही छायाचित्रात दिसाल, असे सांगत मी साधासुधा नाही तर अतिविषारी किंग कोर्बा असल्याचा दावा त्यांनी केला होता.
या प्रचारासभांतील भाषणाप्रकरणी मिथुन यांच्याविरोधात एका संघटनेने पोलिसांकडे तक्रार दाखल झाली होती. एफआयआररद्द करण्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने मिथुन चक्रवर्ती यांची चौकशी करण्याचे निर्देश दिले होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App