वृत्तसंस्था
वायनाड : केरळच्या वायनाडमध्ये ( Wayanad )मुसळधार पावसानंतर झालेल्या भूस्खलनात मृतांची संख्या ३१३ वर पोहोचली आहे. 130 लोक रुग्णालयात आहेत. अपघाताला चार दिवस उलटले तरी 206 जण बेपत्ता आहेत. 105 मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. तर वारस नसलेल्या मृतदेहांवर प्रोटोकॉलनुसार अंत्यसंस्कार केले जातील. हवामान खात्याने आज (2 ऑगस्ट) येथे पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही गुरुवारी रात्री उशिरा (भारतीय वेळेनुसार) या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला. ते म्हणाले- मी आणि जिल (प्रथम महिला) केरळमधील बाधित लोकांप्रती तीव्र शोक व्यक्त करतो. आम्ही पीडितांसाठी प्रार्थना करत आहोत. या कठीण काळात आम्ही भारतासोबत आहोत. बचावकार्यात सहभागी असलेल्या लोकांच्या शौर्याचे आम्ही कौतुक करतो.
29 जुलै रोजी पहाटे 2 ते 30 जुलै रोजी पहाटे 4 वाजेच्या दरम्यान मुंडक्काई, चुरामाला, अट्टामला आणि नूलपुझा गावात दरड कोसळली. घरे, पूल, रस्ते, वाहने वाहून गेली. लष्कराचे जनरल कमांडिंग ऑफिसर मेजर जनरल व्हीटी मॅथ्यू यांनी गुरुवारी सांगितले की, बचाव कार्य पूर्ण झाले आहे. आता केवळ मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे.
दुसरीकडे, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी गुरुवारी वायनाडला पोहोचले होते. आजही ते येथे पीडितांची भेट घेणार आहेत. मदत कार्यासंदर्भात पक्षाच्या नेत्यांचीही भेट घेणार आहे. मेळपाडीच्या ग्रामपंचायतीच्या शिष्टमंडळासोबत ते मदत कार्याबाबत चर्चा करणार आहेत. राहुल यांनी वायनाड आणि रायबरेलीमधून लोकसभा निवडणूक जिंकली होती. त्यांनी वायनाडची जागा सोडली होती. आता प्रियांका वायनाडमधून निवडणूक लढवणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App