भाजपसाठी पक्षापेक्षा देश मोठा आहे आणि देशहिताचे मोठे आणि कठोर निर्णय घेण्यापासून भाजप कधीही मागे हटत नाही, असं मोदींनी म्हटलं आहे.
नवी दिल्ली: 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा निवडणूक जाहीरनामा (संकल्प पत्र) प्रसिद्ध केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील तणावपूर्ण वातावरणाचा उल्लेख करताना म्हटले की, आज जगात अनिश्चिततेचे ढग आहेत, युद्धाची परिस्थिती आहे. जागतिक संकट आणि तणावपूर्ण जागतिक वातावरणात जगभरात राहणाऱ्या भारतीयांची सुरक्षा ही त्यांच्या सरकारची प्राथमिकता आहे.War situation in the world a strong and stable government with absolute majority in the country is necessary PM Modi
मोदी म्हणाले की, जेव्हा जगात अनेक तणाव आणि संकटे पसरलेली आहेत, तेव्हा भारतात पूर्ण बहुमत असलेल्या मजबूत, स्थिर सरकारची गरज अनेक पटींनी वाढते. तसेच पंतप्रधान मोदींनी देशातील मतदारांना लोकसभा निवडणुकीत पुन्हा भाजपला निवडून देण्याचे आवाहन केले. भाजपसाठी पक्षापेक्षा देश मोठा आहे आणि देशहिताचे मोठे आणि कठोर निर्णय घेण्यापासून भाजप कधीही मागे हटत नाही, असे सांगितले.
वन नेशन, वन इलेक्शनचा संकल्प घेऊन पुढे जाण्याबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले की, देशाच्या हितासाठी समान नागरी संहिता लागू करणे भाजप देशासाठी महत्त्वाचे मानते. गरिबांची लूट करणाऱ्यांना तुरुंगात पाठवले जाईल आणि भ्रष्टाचाऱ्यांवर अशीच कठोर कारवाई सुरूच राहील, ही मोदींची गॅरंटी असल्याचे ते म्हणाले. ४ जूनला निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपच्या संकल्पपत्रिकेवर काम वेगाने सुरू होईल, असे ते म्हणाले. सरकारने 100 दिवसांच्या कृती आराखड्यावर काम सुरू केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App