“पुरोगामी” पवारांनी सून “बाहेरून आलेली पवार” ठरवली, तर संकेतभंग करत मोदींची तुलना रशियाच्या पुतिनशी केली!!

विशेष प्रतिनिधी

माळशिरस : महाराष्ट्राला महिला धोरण दिल्याचा डंका पिटणाऱ्या “पुरोगामी” शरद पवारांनी पवारांच्या घरात लग्न करून आलेली सून “बाहेरून आलेली पवार ठरवली”, तर आता त्यापलीकडे जाऊन पवारांनी आंतरराष्ट्रीय संकेतांचा भंग करत पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना थेट रशियाच्या पुतिनशी केली आहे!!… एकूण पवारांना “स्वतः” शिवाय दुसरे काहीच दिसत नाही, हे यातून स्पष्ट होत आहे. Sharad pawar not only insulted his daughter in law, but also compared Modi with Putin

आत्तापर्यंत बारामतीकरांनी पवारांच्या घरातल्या सगळ्यांना निवडून दिले आहे. आता त्यांनी सुनेला निवडून द्यावे, असे आवाहन अजित पवारांनी बारामतीतल्या मेळाव्यात केले होते. अजित पवारांच्या त्या आवाहनाला प्रत्युत्तर देताना शरद पवारांनी त्यांच्याच घरात लग्न करून आलेली सून म्हणजे सुनेत्रा पवार “बाहेरून आलेली पवार” ठरवली होती. त्यावर खासदार अमोल कोल्हे, पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांच्यासह सगळे नेते कुत्सितपणे हसले होते. पण पवारांच्या या वक्तव्यामुळे सुनेत्रा पवारांना मात्र अश्रू अनावर झाले होते. शरद पवार त्या वक्तव्यामुळे सगळीकडून ट्रोल झाले.

पण म्हणून पवारांनी वादग्रस्त वक्तव्य करणे थांबवलेले नाही. आज अकलूज मध्ये विजयसिंह मोहिते पाटलांच्या घरी पत्रकार परिषद घेताना पवारांनी संकेतभंग करून पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतिन यांच्याशी केली. पुतिन यांना जसा रशियात एकहक विरोधी पक्ष नेता शिल्लक नको आहे, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना भारतात विरोधी पक्ष शिल्लक ठेवायचा नाही, असा आरोप पवारांनी केला. भाजप नेते अब की बार 400 पर म्हणत आहेत, पण त्यांनी 400 कशाला 543 चा आकडा सांगायला पाहिजे, असा टोमणा पवारांनी मारला.

पवारांकडून संकेतभंग

पण पवारांनी एकीकडे सुनेचा अपमान करताना दुसरीकडे आंतरराष्ट्रीय संकेतांचा देखील भंगच केला. कुठल्याही देशाच्या निवडणुकीत प्रचारामध्ये सर्वसाधारणपणे दुसऱ्या कुठल्याही देशातल्या राजकीय व्यवस्थेवर अथवा राजकीय नेत्यावर सहसा भाष्य करू नये किंवा टीका टिप्पणी करू नये असा संकेत आहे. पवारांनी तो संकेत अकलूज मध्ये मोडला. भारत आणि रशिया यांचे संबंध पूर्वापार सौहार्दाचे आहेत. पंडित नेहरू, इंदिरा गांधी यांच्या काळापासून ते आत्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी पर्यंत सर्व नेत्यांनी रशियाशी चांगले संबंध टिकवून ठेवले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतिन यांची विशेष केमिस्ट्री आहे, पण शरद पवारांनी या सगळ्या बाबींकडे दुर्लक्ष करून आंतरराष्ट्रीय संकेतांचा भंग करून मोदी आणि पुतिन यांची तुलना केली आहे.

Sharad pawar not only insulted his daughter in law, but also compared Modi with Putin

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात