वृत्तसंस्था
इंफाळ : मणिपूरमधील मैतेई दोन विद्यार्थ्यांचे अपहरण करून हत्या झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर मणिपूर पुन्हा अस्वस्थ झाले आहे. न्यायाच्या मागणीसाठी तरुणांची निदर्शने बुधवारी दुसऱ्या दिवशीही सुरूच होती. दोन दिवस शाळा बंद ठेवण्याची घोषणा करूनही विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून रॅली काढली. इंफाळमध्ये हजारो तरुणांनी निदर्शने केली.Violence again in Manipur, ‘AFSPA’ extended by 6 months in the limits of 19 police stations
इंफाळमध्ये सुरक्षा दलांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. लोकलाबुंग येथे इंफाळ पूर्वेतील एसडीओपीचे वाहन जाळण्यात आले. थौबलमध्ये आंदोलकांनी भाजपचे विभागीय कार्यालय जाळले ाआणि ५ हजारांहून अधिक तरुणांनी डीसी कार्यालयावर धडक दिली. दोन दिवसांच्या आंदोलनादरम्यान सुरक्षा दलांनी बळाचा वापर केल्याने १४० विद्यार्थी जखमी झाले आहेत. बिघडलेली परिस्थिती पाहून इंफाळ पूर्व आणि इंफाळ पश्चिम जिल्ह्यांमध्ये संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
दरम्यान, बुधवारी केंद्र सरकारने मणिपूरच्या डोंगराळ भागात अफस्पा कायद्याला सहा महिन्यांची मुदतवाढ दिली. १ अॉक्टोबरपासून १९ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत व आसाम सीमेनजीक भागात अफस्पा लागू राहिल. इकडे विद्यार्थ्यांच्या हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआयचे विशेष संचालक अजय भटनागर यांच्या नेतृत्वाखालील पथक इंफाळमध्ये दाखल झाले.
आसाम-मेघालय सीमेवर स्थानिक भिडले; बाणांचा मारा
इकडे आसाम-मेघालय आंतरराज्य सीमेवरील अशांत भागातील एका गावात दोन्ही बाजूंच्या २५० ते ३०० स्थानिक नागरिकांमध्ये धुमश्चक्री उडाली. दोन्ही बाजूंनी बाणांचे हल्ले होत होते. यामध्ये आसाममधील कार्बी आंगलाँग जिल्ह्यातील एक व्यक्ती जखमी झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खासी शेतकऱ्यांच्या झोपड्याही जळाल्या आहेत. गेल्या वर्षी आसाम आणि मेघालयमध्ये सहा भागांचा सीमावाद सोडवण्यासाठी करार झाला होता.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App