वृत्तसंस्था
नवी दिल्ली : हेरगिरी करणारे चीनचे अवाढव्य जहाज ‘शि यान सिक्स’ हिंद महासागरात पोहोचले आहे. ऑक्टोबर महिन्यात ते श्रीलंकेच्या एका बंदरात दाखल होण्याची शक्यता आहे. परंतु यावरून आंतरराष्ट्रीय राजकारण तापले आहे. भारत आणि अमेरिकेने चीनच्या घुसखोरीबद्दल तीव्र आक्षेप नोंदवून चिंता व्यक्त केली आहे, तर दुसरीकडे जहाजाला नांगर टाकण्याची परवानगी दिली नव्हती असे स्पष्टीकरण श्रीलंकेने दिले आहे.Intrusion of Chinese spy ship into Indian Ocean; India and America objected, Sri Lanka also had no permission
अमेरिकेने बंद केला चीनच्या वुहान लॅबचा निधी; अमेरिकी आरोग्य सेवेचा निर्णय, येथूनच कोरोना व्हायरस पसरल्याचा संशय
भारताला वाटणारी चिंता आमच्या दृष्टीने महत्त्वाची आहे, अशी प्रतिक्रिया श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री अली साबरी यांनी व्यक्त केली. शि यान सिक्स हे जहाज तीन महिने श्रीलंकेत संशोधनासाठी थांबणार आहे. या जहाजाबद्दल भारताने दीर्घकाळापासून शंका उपस्थित केल्या आहेत. त्यामुळेच १२९ मीटर लांबीच्या या अवाढव्य जहाजाच्या कथित संशोधनाचे काम वारंवार पुढे ढकलले होते. अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयातील राजनैतिक खात्याच्या उपपरराष्ट्रमंत्री व्हिक्टोरिया नूलँड यांनी संयुक्त राष्ट्र आमसभेत श्रीलंकेच्या समक्ष हा मुद्दा उचलला. यावर बोलताना श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री साबरी म्हणाले, कोणत्याही जहाजाला परवानगी दिली जात नाही.
सन २०१९ पासून आजतागायत ४८ चिनी जहाजे तैनात
सन २०१९ पासून सुमारे ४८ वैज्ञानिक संशोधन करणारे चीनचे जहाज हिंद महासागरात तैनात करण्यात आले आहे. ऑगस्ट महिन्यात क्षेपणास्त्रे आणि उपग्रहाचा माग काढणाऱ्या शस्त्र सज्ज युआन वांग फाइव्ह जहाजाने श्रीलंकेच्या हंबनटोटा बंदरात घुसखोरी केली होती.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App