विशेष प्रतिनिधी
मुंबई : Vinod Kambli भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज विनोद कांबळी यांना प्रकृतीच्या कारणास्तव ठाणे ( भिवंडी ) येथील आकृती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार त्यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांनी आकृती हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी चर्चा करून विनोद कांबळी यांच्या उपचारात कोणतीही गोष्ट कमी राहणार नाही याची काळजी घ्या अशी विनंती केली.Vinod Kambli
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कांबळी यांस वैयक्तिक ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून ही मदत पूढील आठवड्यात करण्यात येणार आहे. येणाऱ्या काळात त्यांना अजून मदत करण्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आश्वासन दिल्याचे ओएसडी मंगेश चिवटे यांनी सांगितले.
राज्याचे संवेदनशील माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या मदतीबद्दल क्रिकेटपटू विनोद कांबळी यांनी कृतज्ञता व्यक्त केली. हॉस्पिटलमध्ये भेटण्याची विनंती केली. लवकरच उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि संवेदनशील खा डॉ श्रीकांत शिंदे हे क्रिकेटपटू विनोद कांबळी यांची भेट घेऊन कांबळी परिवाराला मदत करणार आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App