Paris Olympics : फक्त 100 ग्रॅम वजन वाढल्याने विनेश फोगाट अपात्र; भारताला धक्का, सुवर्ण पदक हुकले!!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतून समस्त भारतीयांना निराश करणारी बातमी आली. विनेश फोगाटने तिचं ऑलिम्पिक मेडल गमावले. महिला कुस्तीच्या 50 किलो वजनी गटातून विनेश काल फायलनमध्ये पोहोचली होती. तिने एकाच दिवसात जगातील तीन अव्वल कुस्तीपटूना नमवले होते. पण विनेश फोगाटला फायनलसाठी अपात्र ठरवण्यात आले कारण तिचं वजन फक्त 100 ग्रॅम जास्त भरले. त्यामुळे विनेश फायनलसाठी अपात्र ठरली. Vinesh Phogat disqualified  Womens Wrestling olympic 24

ऑलिम्पिक नियमानुसार, जी मर्यादा आहे, त्यापेक्षा विनेशच वजन 100 ग्रॅम जास्त होतं. नियमानुसार, कुठल्याही रेसलरला कुठल्याही वजनी गटात फक्त 100 ग्रॅम जास्त वजनाची परवानगी दिली जाते. पण विनेशच वजन यापेक्षा जास्त होते. इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनने विनेश फोगाटला अयोग्य ठरवण्यात आल्याची पृष्टी केली. IOA ने माहिती दिलीय की, 50 किलो वजनी गटातून विनेशला अपात्र ठरवण्यात आल.

विनेश ओव्हरवेट झाल्याने या गटात सिल्वर मेडल कोणालाही मिळणार नाही. आता या कॅटेगरीत अमेरिकेच्या कुस्तीपटूला गोल्ड मेडल मिळेल. मंगळवारच्या सामन्यांसाठी विनेशने तिचं वजन 50 किलो किंवा त्यापेक्षा कमी ठेवले होते. ऑलिम्पिकच्या नियमानुसार कुस्तीपटूला सामन्याच्या दोन्ही दिवशी तितकच किंवा त्यापेक्षा कमी वजन कायम ठेवावे लागते. विनेशने अनेक अडथळ्यांची शर्यत पार करुन हे यश मिळवलं होतं. विनेश फोगाट 53 किलो वजनी गटात खेळायची. पण ऑलिम्पिकसाठी तिने 3 किलो वजन कमी केलं. ती 50 किलो गटात उतरली. मंगळवारी रात्री विनेशच वजन 52 किलो होतं. ती कालची अख्खी रात्र झोपली नाही. वजन कमी करण्यासाठी जे केलं पाहिजे, ते सर्व तिने केलं. जॉगिंग, सायकलिंग सर्व काही. पण अखेर पदकाने हुलकावणी दिलीच.

आज सगळ्या भारताला तिच्याकडून सुवर्णपदकाची अपेक्षा होती. काल तिने तीन दिग्गज कुस्तीपटूंना नमवलं होतं. विनेश फोगाटने पॅरिस ऑलिम्पिकमधील आपल्या मोहिमेची सुरुवातच सर्वांना आश्चर्यचा धक्का देऊन केली. विनेशने जगातील नंबर 1 कुस्तीपटू युई सुसाकीला हरवलं. विनेशशी सामना होण्याआधी जापानची ही कुस्तीपटू कधीच कुठला सामना हरली नव्हती. तिच्या नावावर 82-0 चा रेकॉर्ड होता. पण विनेशने पहिल्याच सामन्यात तिला हरवलं. सेमीफायनलमध्ये तिने प्रतिस्पर्ध्यावर एकतर्फी विजय मिळवला. समोरच्या महिला कुस्तीपटूला रिंगमध्ये डोकं वर काढण्याची संधीच दिली नाही. विनेशने 5-0 ने विजय मिळवला.

Vinesh Phogat disqualified from the Womens Wrestling 50kg final because of overweight

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात