वृत्तसंस्था
वाराणसी : येथील काशी विश्वनाथ मंदिराचा केलेला कायापालट आणि जीर्णोद्धार पाहून नेपाळच्या पंतप्रधानाच्या पत्नी अर्झुराणा देऊबा भारावल्या.नेपाळच्या पंतप्रधान शेर बहद्दुर देऊबा आणि त्यांच्या पत्नी अर्झुराणा देऊबा या तीन दिवसांच्या भारत भेटीवर आले आहेत.Uttar Pradesh: Nepal PM’s wife Arzu Rana Deuba thank PM Narendra Modi, CM Yogi Adityanath for organizing great event in Varanasi
त्यांनी वाराणासी तील काशी विश्वनाथ मंदिराला भेट दिली. तेव्हा मंदिराचे भव्य रूप पाहून त्या आश्चर्य चकित झाल्या. कारण काही वर्षांपूर्वी त्या भारत भेटीवर आल्या होत्या. तेव्हा काशी विश्वनाथ मंदिर परिसर अत्यंत चिंचोळा, दुर्लक्षित आणि घाणेरडा होता.
केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार येताच त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सहकार्याने मंदिर परिसराचा जीर्णोद्धार केला. काशी म्हणजे हिंदूंचे पवित्रस्थान आहे. त्यामुळे तिला पूनर वैभव प्राप्त करून देणे आवश्यक होते.
मंदिर कायापालट बरोबर गंगा घाट याची स्वच्छता आणि गंगेचे स्वच्छता अभियान राबविले. सात वर्षात काशी विश्वनाथ मंदिराला पुन्हा पूर्वीचे वैभव भाजपने प्राप्त करून दिले आहे. त्यामुळे तेथे दर्शनाला आता लोकांना जावेसे वाटते.
भारत आणि नेपाळ यांची संस्कृती आणि धर्म एकच असल्याचे सांगताना त्या म्हणाल्या. दोन्ही देशांना एकाच हिंदू संस्कृतीचा वारसा लाभला आहे. भारतात काशी विश्वनाथ असून नेपाळमध्ये पशुपतीनाथ मंदिर आहे. दोन्ही देशातील नागरिक एकमेकांच्या देशात जा ये करत असतात.
त्यामुळे आम्ही दोन देश आहेत, असे मानत नाही .कारण दोन्ही देशांची संस्कृती, परंपरा एकच आहेत. वाराणसी भेटी बद्दल आणि स्वागता बद्दल त्यांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचे आभार मानले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App