उत्पल पर्रिकर यांचा निर्णय झाला; पणजीतून अपक्ष लढणार!!

वृत्तसंस्था

पणजी : गोव्याचे माजी मुख्यमंत्री कै. मनोहर पर्रीकर यांचा यांचे चिरंजीव उत्पल पर्रिकर यांचा अखेर राजकीय निर्णय झाला आहे. ते आपल्या वडिलांचा पारंपारिक मतदारसंघ पणजी येथूनच अपक्ष म्हणून गोवा विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. भाजपने त्यांना तिकीट नाकारले होते. पक्षाने त्यांना अन्य दोन ऑफरही दिल्या होत्या. परंतु त्यांनी फेटाळून लावल्या आणि आपला निर्णय अखेर आज सायंकाळी जाहीर केला.Utpal pafikaf to contest Independent from panjim


गोव्यात उत्पल पर्रीकरांवर आपबरोबरच शिवसेना- राष्ट्रवादीचा डोळा, पाठिंबा देण्याचे दिले आश्वासन


आता उत्पल पर्रीकर यांची भाजपचे उमेदवार बाबूश मोन्सेरात यांच्या समवेत पणजीत लढत होणार आहे. भाजपने तिकीट नाकारल्यानंतर उत्पल पर्रीकर यांना शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पार्टी या तीनही पक्षांनी आपापल्या पक्षातून निवडणूक लढवण्याची ऑफर दिली होती. परंतु उत्पल पर्रीकर यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. गेली अनेक वर्षे त्यांचे या मतदारसंघात काम आहे. शिवाय मनोहर पर्रीकर यांच्या दोन निवडणुकांमध्ये त्यांनी प्रचार प्रमुख म्हणून देखील काम केले आहे. मनोहर पर्रीकर यांच्या समवेत असणारे अनेक कार्यकर्ते सध्या उत्पल पर्रीकर यांच्याबरोबर काम करत आहेत.

परंतु भाजपने त्यांना पणजी मतदारसंघातून तिकीट नाकारले त्याच वेळी त्यांना गोव्यातल्या अन्य दोन मतदारसंघांचा पर्याय देऊन निवडणूक लढवण्याची ऑफर दिली होती तसेच उत्पल पर्रीकर यांना राष्ट्रीय पातळीवरून पक्षसंघटनेत काम करण्याची ऑफर देण्यात आली होती. परंतु अखेर उत्पल यांनी आपला पारंपरिक पण ही मतदारसंघ न सोडता तेथूनच अपक्ष म्हणून आपले नशीब आजमावण्यासाठी ठरवले आहे.

Utpal pafikaf to contest Independent from panjim

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात