उत्तर प्रदेशात भाजपची वाढली ताकद, राष्ट्रीय जनक्रांती आणि राष्ट्रीय समतावादी पक्ष भाजपमध्ये विलिन

उत्तर प्रदेशच्या निवडणुकांत भारतीय जनता पक्षाला मिळणारा पाठिंबा वाढू लागला आहे. दिवंगत मुख्यमंत्री कल्याण सिंह यांच्या राष्ट्रीय जनक्रांती पक्षाच्या यूपी युनिटसह आणखी एक राष्ट्रीय समतावादी पक्ष भाजपमध्ये विलीन झाले आहेत. त्याचबरोबर पाच पक्ष आणि संघटनांनी यूपी निवडणुकीत भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे.Increased strength of BJP in Uttar Pradesh, National People’s Revolution and National Equality Party merged with BJP


विशेष प्रतिनिधी

लखनऊ: उत्तर प्रदेशच्या निवडणुकांत भारतीय जनता पक्षाला मिळणारा पाठिंबा वाढू लागला आहे. दिवंगत मुख्यमंत्री कल्याण सिंह यांच्या राष्ट्रीय जनक्रांती पक्षाच्या यूपी युनिटसह आणखी एक राष्ट्रीय समतावादी पक्ष भाजपमध्ये विलीन झाले आहेत.

त्याचबरोबर पाच पक्ष आणि संघटनांनी यूपी निवडणुकीत भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. राष्ट्रीय जनक्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. एनपी सिंह यांनी भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत वाजपेयी यांना विलीनीकरणाचे पत्र सुपूर्द केले. राष्ट्रीय समतावादी पक्षाच्या वतीने पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपाल निषाद यांनी विलिनीकरणाचे पत्र दिले.

पूर्वांचलमध्ये राष्ट्रीय समतावादी पक्षाचा विशेष प्रभाव आहे. पूर्वांचलच्या 25 जिल्ह्यांमध्ये त्याचा प्रभाव आहे. त्यामुळेच भाजपने त्यांना सोबत घेतले आहे. पूर्वांचलचे वर्चस्व असलेले ओमप्रकाश राजभर हे यावेळी सपासोबत आहेत, त्यामुळे भाजपने स्वत:ला मजबूत करण्यासाठी निषाद पक्षाशिवाय राष्ट्रीय समतावादी पक्षाला आपल्याकडे खेचले आहे.

दोन पक्षांच्या विलीनीकरणासह मानवतावादी समाज पक्ष, किसान शक्ती जनतंत्र पक्ष, राष्ट्रवादी ब्राह्मण महासंघ आणि हिंदू युवा वाहिनी इंडियाच्या यूपी युनिटसह इतर अनेक संघटना आणि पक्षांनी विधानसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे

Increased strength of BJP in Uttar Pradesh, National People’s Revolution and National Equality Party merged with BJP

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात