छगन भुजबळही म्हणाले होते गांधींचे पुतळे उखडा आणि तेथे नथुरामाचे उभे करा, तरीही शरद पवारांनी त्यांना घेतले राष्ट्रवादीत, अतुल भातखळकर यांनी करून दिली आठवण


राष्ट्रवादी कॉँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्हाय आय किलड गांधी या चित्रपटात नथुराम गोडसेची टीका केली आहे. त्यामुळे पक्षातूनच त्यांच्यावर टीका होत आहे. छगन भुजबळही म्हणाले होते की गांधी यांचे पुतळे उखडून टाका आणि त्याठिकाणी नथुरामाचे पुतळे उभारावा. मात्र, तरीही शरद पवार यांनी त्यांना राष्ट्रवादीत घेतले अशी आठवण भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी करून दिली आहे.Chhagan Bhujbal had also said to uproot the statues of Gandhi and erect Nathuram there


विशे प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्हाय आय किलड गांधी या चित्रपटात नथुराम गोडसेची टीका केली आहे. त्यामुळे पक्षातूनच त्यांच्यावर टीका होत आहे. छगन भुजबळही म्हणाले होते की गांधी यांचे पुतळे उखडून टाका आणि त्याठिकाणी नथुरामाचे पुतळे उभारावा. मात्र, तरीही शरद पवार यांनी त्यांना राष्ट्रवादीत घेतले अशी आठवण भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी करून दिली आहे.

भातखळकर म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांचे कोणतेही निश्चित धोरण नाही. त्यांचे महात्मा गांधींबद्दलचे प्रेम म्हणजे ढोंगीपणा आहे. राष्ट्रवादी असा पक्ष आहे की ज्याला कुठला विचार नाही, धोरण नाही. शरद पवारांच्या आयुष्याचं ध्येय केवळ सत्तेत राहणं एवढंच आहे. ज्या छगन भुजबळांनी एकेकाळी महात्मा गांधींचे पुतळे उखडून टाका आणि त्या ठिकाणी नथुरामाचे उभे करा असे वक्तव्य केले होते, त्या छगन भुजबळांना पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामावून घेतले.


साहित्य संमेलनासाठी अखेर फडणवीस यांना निमंत्रण, छगन भुजबळ यांची मध्यस्ती


राष्ट्रवादी किंवा शरद पवारांच्या धोरणांशी हे (प्रकरण) सुसंगत नाही. कोणी काहीही करो आपण केवळ सत्तेत आलो पाहिजे हे त्यांचं एकमेव धोरण असून त्याचाच हा परिपाक आहे, असे सांगून भातखळकर म्हणाले, एकीकडे महात्मा गांधीच्या विचारांबद्दल कौतुकाने बोलायचे आणि इथे स्वत:च्या पक्षाचा खासदार अनावश्यक पद्धतीने नथुरामची भूमिका साकारतोय त्यालाही पाठिंबा द्यायचा. त्यांचा वैचारिक ढोंगीपणा या निमित्ताने उघडा पडलेलाय.

Chhagan Bhujbal had also said to uproot the statues of Gandhi and erect Nathuram there

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात