गोव्यात उत्पल पर्रीकरांवर आपबरोबरच शिवसेना- राष्ट्रवादीचा डोळा, पाठिंबा देण्याचे दिले आश्वासन


विशेष प्रतिनिधी

पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी जमीन शोधण्याच्या प्रयत्नात आहेत. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांच्यावर दोन्ही पक्षांचा डोळा आहे. उत्पल पर्रीकर यांच्या संभाव्य बंडखोरीवर आम आदमी पक्षासह या दोन्ही पक्षांनी मदार ठेवत त्यांना ऑफर देणे सुरू केले आहे.Shiv Sena-NCP eye on Utpal Parrikar in Goa, promised to support

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उत्पल पर्रिकर यांना आपमध्ये प्रवेशाची ऑफर दिलीय. त् राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही उत्पल यांना पक्ष प्रवेशाची ऑफर देण्यात आली आहे. त्याचबरोबर ते अपक्ष लढल्यासही पाठिंबा देणार असल्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.



आव्हाड म्हणाले, भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल असे मला वाटत नाही. त्यांचा इथे एक पाया होता. ख्रिश्चनांनीही मनोहर पर्रिकर यांना स्वीकारले होते. पण आता ख्रिश्चन स्वीकारतील असा चेहरा भाजपकडे नाही. या मतांशिवाय सत्तेत येणं कठीण असते. मराठी मते शिवसेना कापणार. दोन्हीकडे जे कापकापीचे राजकारण त्यात कोण बाजी मारेल हे सांगता येत नाही.

भाजपचा मला तुटलेला दुवा इथे दिसतोय की, ते पाया गमावत आहेत. जे काँगेसने वाढवले (बाबुश मोंसेरात) ते पक्षाचे होऊ शकले नाहीत, ते भाजपचे काय होणार? पण जे पर्रीकर गोव्याच्या घराघरात दिसले. कुठेही चणे खात उभे राहायचे, फिश मार्केट मध्ये फिरायचे, स्कुटरवर फिरायचे, त्यांना गोवन आपला मानायचा.

अचानक भाजपने फॉम्युर्ला लावावा की नेत्याच्या मुलाला तिकीट देता येणार नाही, हे चुकीचे आहे. काम दाखवावे लागेल हे ठीक आहे. पण आपण भारतीय संस्कृतीत राहातो. पर्रीकर यांच्याविषयी त्यांच्या मतदार संघात असलेली सहानुभूती ती काहीही बोललात तरीही नाकारता येणार नाही. उत्पल पर्रिकर अपक्ष उभे राहिले तर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आहे.

मी येत्या एक दोन दिवसात त्यांना भेटून आमंत्रणही देईन की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढा. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.

गोव्यातील राजकीय स्थितीवर बोलताना आव्हाड म्हणाले की, गोव्यात मला अस्थिरता दिसतेय. गेल्या दोन महिन्यात उत्तर भारतात ख्रिश्चनांविरोधात जे वातावरण तयार करण्यात आले, खास करून आग्रा, दिल्ली तिथे चर्चच्या बाहेर सांताक्लॉज मुरदाबादच्या घोषणा दिल्या गेल्या.

त्याला जाळणे अशा विचित्र घटनांनी फक्त गोव्यातीलच नव्हे, तर संपूर्ण देशातील ख्रिश्चन अस्वस्थ झाले. साधारण अल्पित राहणारा असा समाज आहे. उत्तरेचे पडसाद गोव्यात उमटले. त्यामुळे मोठा बदल होऊही शकतो, अशी शक्यता आव्हाड यांनी व्यक्त केली आहे.

Shiv Sena-NCP eye on Utpal Parrikar in Goa, promised to support

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात