इंडिया गेट मध्ये नेताजींचा पुतळा : नेताजींच्या कन्या अनिता बोस पफ यांना आनंद!!


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत इंडिया गेट मध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा ग्रॅनाईट मध्ये पुतळा घडवून उभारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. याविषयी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या कन्या अनिता बोस पफ यांनी समाधान व्यक्त केले आहे.Very happy that Netaji’s statue would be put up in a prominent place in Delhi

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अतुलनीय योगदान आहे. देशाच्या विकासासाठी त्यांची विशाल दृष्टी होती. देशातल्या कोट्यावधी युवकांनी सुभाष चंद्र बोस यांच्याकडून प्रेरणा घेऊन काम केले आहे. त्यांचा पुतळा देशाच्या राजधानीत अतिशय महत्त्वपूर्ण जागेवर उभा राहणे ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे, अशा शब्दांत अनिता बोस पफ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

येत्या 23 जानेवारी रोजी नेताजी सुभाष चंद्र बोस यांची 125 वी जयंती आहे. या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इंडिया गेट येथे नेताजींच्या होलोग्राम पुतळ्याचे अनावरण होणार आहे. त्याच ठिकाणी ग्रॅनाईटचा पुतळा पूर्ण झाल्यानंतर उभारण्यात येईल, असे ट्विट स्वतः मोदींनीच आज दुपारी केले होते. देशभरातून या विषयी आनंदाच्या प्रतिक्रिया आले असून त्यातच नेताजींच्या कन्या अनिता बोस यांनी देखील समाधान व्यक्त करणारी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Very happy that Netaji’s statue would be put up in a prominent place in Delhi

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात