केंद्रातील मोदी सरकारने आणखी 35 यूट्यूब चॅनल ब्लॉक केले आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे संयुक्त सचिव विक्रम सहाय यांनी सांगितले की, मंत्रालयाला काल 20 जानेवारी रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आम्ही 35 यूट्यूब चॅनेल, 2 ट्विटर अकाऊंट, 2 इंस्टाग्राम अकाउंट, 2 वेबसाइट, एक फेसबुक खाते ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत. या सर्व खात्यांबाबत कॉमन गोष्ट म्हणजे ते पाकिस्तानमधून चालवले जात होते आणि भारतविरोधी खोट्या बातम्या आणि इतर मजकूर प्रसारित करत होते.Another 35 YouTube channel blocked by central government, due to anti-India content
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने आणखी 35 यूट्यूब चॅनल ब्लॉक केले आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे संयुक्त सचिव विक्रम सहाय यांनी सांगितले की, मंत्रालयाला काल 20 जानेवारी रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आम्ही 35 यूट्यूब चॅनेल, 2 ट्विटर अकाऊंट, 2 इंस्टाग्राम अकाउंट, 2 वेबसाइट, एक फेसबुक खाते ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत.
या सर्व खात्यांबाबत कॉमन गोष्ट म्हणजे ते पाकिस्तानमधून चालवले जात होते आणि भारतविरोधी खोट्या बातम्या आणि इतर मजकूर प्रसारित करत होते.विक्रम सहाय म्हणाले की, हे भारताविरुद्ध अपप्रचार पसरवणाऱ्या इन्फॉर्मेशन वॉरसारखे आहे. गुप्तचर यंत्रणांकडून सातत्याने यावर लक्ष ठेवले जात आहे.
The common factor amongst all these accounts have been that they operate from Pakistan and spread fake anti-India news & other content: Vikram Sahay, Joint Secretary (P&A), Ministry of Information and Broadcasting pic.twitter.com/AQMJkVk2CM — ANI (@ANI) January 21, 2022
The common factor amongst all these accounts have been that they operate from Pakistan and spread fake anti-India news & other content: Vikram Sahay, Joint Secretary (P&A), Ministry of Information and Broadcasting pic.twitter.com/AQMJkVk2CM
— ANI (@ANI) January 21, 2022
यापूर्वी 19 जानेवारी रोजी माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले होते की सरकार देशाविरूद्धच्या “षड्यंत्रकर्त्या” विरोधात कारवाई करत राहील. ते म्हणाले होते, “मी त्यांच्यावर कारवाईचे आदेश दिले होते. मला आनंद आहे की जगभरातील अनेक मोठ्या देशांनी याची दखल घेतली आहे. यूट्यूबनेही पुढे येऊन त्यांना ब्लॉक करण्याची कारवाई केली.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने गतवर्षी डिसेंबरमध्ये, गुप्तचर संस्थांसोबत एकत्रित प्रयत्नात 20 यूट्यूब चॅनेल आणि दोन वेबसाइट्स भारतविरोधी प्रचार आणि खोट्या बातम्या पसरवत असल्याने त्यांना ब्लॉक करण्याचे आदेश दिले.
मंत्रालयाने म्हटले होते की, या चॅनेलचा वापर काश्मीर, भारतीय सैन्य, भारतातील अल्पसंख्याक समुदाय, राम मंदिर, जनरल बिपिन रावत इत्यादी विषयांवर समन्वितपणे फूट पाडणारा मजकूर पोस्ट करण्यासाठी केला जात आहे.”
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more