विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवारांनी स्वतः संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात युपीएचे अध्यक्षपद यांना मिळण्याची शक्यता नाकारल्यानंतरही शिवसेनेचे प्रवक्ते आणि मावळते खासदार संजय राऊत यांनी पवारांच्या यूपीए अध्यक्षपदाच्या मुद्द्याला पुन्हा एकदा उकळी आणली आहे. UPA Chairman: Sharad Pawar’s re-election as UPA chairman by Sanjay Raut !!; Modi has no alternative but Pawar !! UPA Chairman: Sanjay Raut re-elected Sharad Pawar as UPA President !! Modi has no choice but Pawar !!
शरद पवार हे मोठे नेते आहेत. त्यांनी सर्व विरोधकांना एकत्र आणावे. त्यांच्या शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केंद्रीय पातळीवर पर्याय उभा राहू शकत नाही, असे वक्तव्य संजय राऊत यांनी त्यांच्या नेहमीच्या पत्रकार परिषदेत केले आहे.
वास्तविक शरद पवार यांच्या युपीए अध्यक्ष पदाचा मूळ विषय संजय राऊत यांनी सहा महिन्यांपूर्वी उकरून काढला होता. परंतु त्यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तो खारीज केला होता. सहा महिन्यांनंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नवी दिल्लीतल्या मेळाव्यात पवारांचा यूपीए अध्यक्ष पदाचा ठराव संमत करण्यात आला. म्हणून त्या विषयाची पुन्हा चर्चा सुरू झाली. दोन दिवस चर्चा झाल्यानंतर पवारांनी स्वतः कोल्हापुर मधल्या पत्रकार परिषदेत यूपीए अध्यक्षपद मिळण्याची शक्यता फेटाळली. मात्र संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने पुन्हा एकदा पवारांच्या यूपीए अध्यक्षपदाच्या चर्चेला उकळी आणली आहे.
मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका शिवसेना ताकदीने लढेल आणि जिंकेल, असा दावा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी यावेळी केला. मुंबई महापालिकेच्या तोंडावर शिवसेना, भाजप आणि आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही आक्रमक झाली आहे. एकीकडे भाजपने आमच्या मागे ईडी लावली, असा आरोप शिवसेनेतून स्वतः राऊतांपासून अनेक नेत्यांनी केला आहे. तर दुसरीकडे भाजप नेते तुमच्या कारनाम्यामुळे तुम्ही गोत्यात येत असल्याचे, म्हणत आहेत. या सा-या घडामोडी देशातील एका राज्याएवढे मोठे बजेट असणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी आहे. आता ही पालिका आमच्याविरोधात कट कारस्थाने करणाऱ्यांच्या छाताडावर पाय ठेवून जिंकू, असा दावा राऊत यांनी केला आहे.
तुम्ही कितीही कारनामे करा. कितीही असंतुष्ट आत्मे एकत्र येऊ द्यात. आम्ही मुंबई महापालिकेवरील भगवा झेंडा खाली उतरू देणार नाही. ही निवडणूक जिंकूच असा इशारा त्यांनी दिला. शिवाय ठाणे, नाशिक, औरंगाबाद, कल्याण डोंबिवली महानगरपालिका ताकदीने लढू आणि जिंकू असा दावाही त्यांनी केला. कोल्हापूर उत्तरमध्येच कशाला, तर गोव्यात, पाच राज्यांत, पणजी आणि साखळी मतदारसंघात ईडी लावा. मात्र, अनेक गाठीभेटी होत असतात. आमच्याकडे अनेक लोक येतात. अशा भेटींविषयी फार बोलण्याची गरज नाही.
संजय राऊत पुढे म्हणाले की, शरद पवार हे देशातील मोठे नेते आहेत. देशातील विरोधी पक्ष एकत्रित यावेत म्हणून हालचाली ठरत आहेत. शरद पवार यांच्या पुढाकाराशिवाय मोदींना पर्याय नाही. त्यांच्याशिवाय विरोधकांची एकजूट होऊ शकणार नाही, असा दावाही राऊतांनी यावेळी केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more