Swami Prasad Maurya : भारतीय जनता पक्ष (भाजप) सोडल्यानंतर उत्तर प्रदेशचे माजी कॅबिनेट मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांच्या अडचणी वाढू लागल्या आहेत. एमपी-एमएलए कोर्टाने स्वामी प्रसाद मौर्य यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. त्यांना 24 जानेवारीपर्यंत हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. UP Elections Court issues arrest warrant for Ex Minister Swami Prasad Maurya, who left BJP
वृत्तसंस्था
लखनऊ : भारतीय जनता पक्ष (भाजप) सोडल्यानंतर उत्तर प्रदेशचे माजी कॅबिनेट मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांच्या अडचणी वाढू लागल्या आहेत. एमपी-एमएलए कोर्टाने स्वामी प्रसाद मौर्य यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. त्यांना 24 जानेवारीपर्यंत हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
2014 मध्ये देवीदेवतांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी माजी मंत्री स्वामी प्रसाद मौर्य बुधवारी न्यायालयात हजर झाले नाहीत, तेव्हा अतिरिक्त मुख्य दंडाधिकाऱ्यांनी आरोपी माजी कामगार मंत्री स्वामी यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्याचे आदेश दिले. आता या प्रकरणाच्या सुनावणीची तारीख 24 जानेवारी निश्चित करण्यात आली आहे.
स्वामी प्रसाद मौर्य यांनी मंगळवारी योगी मंत्रिमंडळाचा राजीनामा देत भाजप सोडण्याची घोषणा केली. यूपी विधानसभा निवडणुकीपूर्वी हा निर्णय धक्कादायक होता. पण आता पुढे काय? हा मोठा प्रश्न आहे. स्वामी प्रसाद मौर्य यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे का? अखिलेश यादव यांच्यासोबत आलेला त्यांचा फोटो हे सूचित करतो पण मौर्य यांच्या मुलीने याचा इन्कार केला आहे. त्याचवेळी मौर्य यांनी स्वत: सपामध्ये 14 तारखेला सामील होण्याचे संकेत दिले आहेत. ते म्हणाले की, खरा भूकंप तर 14 तारखेला येणार आहे.
UP Elections Court issues arrest warrant for Ex Minister Swami Prasad Maurya, who left BJP
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App