विशेष प्रतिनिधी
लखनऊ : पुढील वर्षी उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका आहेत. सर्व राजकीय पक्षांनी आपली निवडणूक रणनीती बनवून प्रचाराला सुरुवात केली आहे. दरम्यान, काँग्रेसने पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना अर्जासह 11-11 हजार रुपये जमा करण्यास सांगितले आहे.UP elections Congress seeks Rs 11,000 donation with applications from ticket aspirants
उत्तर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अजय कुमार लल्लू यांनी यासंदर्भात पत्र जारी केले आहे. यामध्ये त्यांनी तिकीट मागणाऱ्या उमेदवारांना 11-11 हजार रुपये जमा करण्यास सांगितले आहे. ही रक्कम योगदान रकमेच्या रूपात जमा केली जाईल, असे पक्षाचे म्हणणे आहे.
अशा प्रकारे निवडणार उमेदवार
काँग्रेस पक्षाने निवडणुकीत तिकीट देण्यापूर्वी उमेदवारांसाठी विहित नमुना निश्चित केला आहे. उमेदवारांना या फॉर्मद्वारे निवडणूक समितीकडे अर्ज करावा लागेल. काँग्रेसने रूट लेव्हल कमिटी तयार केल्या आहेत, ज्यात पक्षाचे न्याय पंचायत आणि ग्रामपंचायत अध्यक्ष आहेत. या समित्या उमेदवाराची चौकशी करतील आणि निवडणूक समितीला एक रिपोर्ट कार्ड सादर करतील.
केवळ 2 लोकांची नावे हायकमांडकडे जातील
या समित्या उमेदवाराची चौकशी करतील आणि निवडणूक समितीला एक रिपोर्ट कार्ड सादर करतील. 10 जणांची नावे निवडणूक समितीकडे पाठवली जातील. निवडणूक समिती आठ जणांना नकार देईल आणि दोन लोकांची नावे हायकमांडकडे पाठवेल म्हणजेच प्रियंका गांधी वड्रा यांच्याकडे पाठवली जातील. त्यापैकी एक नाव प्रियांका गांधी विधानसभा निवडणुकीसाठी फायनल करतील.
फॉर्ममध्ये प्रश्न
कॉंग्रेस उमेदवाराकडून जे फॉर्म भरून घेत आहे, त्यात त्यांना राजकीय अनुभव विचारण्यात येत आहे. याशिवाय तुम्ही किती काळ काँग्रेसमध्ये काम करत आहात? तुमची पात्रता काय आहे? तुम्ही काँग्रेसच्या धोरणांशी किती परिचित आहात? तुमच्या क्षेत्रात तुमची ओळख कशी आहे? तुमचा गुन्हेगारी इतिहास आहे का? याशिवाय, उमेदवारांना काही ओळींमध्ये सांगावे लागेल की, त्यांना उमेदवार का बनवावे?
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App