UP Elections 2022 : 13 टक्के ब्राह्मण आणि 23 टक्के दलित एकत्र आले तर यूपीत बसपाचे सरकार, सतीश चंद्र मिश्रा यांचा विश्वास

BSP Leader Satish Chandra Mishra Calls Brahmin Society To Come With Mayawati For UP Elections 2022

UP Elections 2022 : प्रभु रामचंद्रांच्या अयोध्यानगरीतून बहुजन समाज पक्षाच्या मिशन 2022 ची सुरुवात झाल आहे. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सतीश चंद्र मिश्रा यांनी महायुतीबाबत मोठे विधान केले आहे. अयोध्यामधील हनुमान गढी आणि श्रीराम लल्ला जन्मभूमी मंदिरात पूजा केल्यानंतर मिश्रा म्हणाले की, उत्तर प्रदेशात 2022च्या विधानसभा निवडणुकीसाठी बसपने सर्वात मोठी युती केली आहे. BSP Leader Satish Chandra Mishra Calls Brahmin Society To Come With Mayawati For UP Elections 2022


विशेष प्रतिनिधी

अयोध्या : प्रभु रामचंद्रांच्या अयोध्यानगरीतून बहुजन समाज पक्षाच्या मिशन 2022 ची सुरुवात झाल आहे. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सतीश चंद्र मिश्रा यांनी महायुतीबाबत मोठे विधान केले आहे. अयोध्यामधील हनुमान गढी आणि श्रीराम लल्ला जन्मभूमी मंदिरात पूजा केल्यानंतर मिश्रा म्हणाले की, उत्तर प्रदेशात 2022च्या विधानसभा निवडणुकीसाठी बसपने सर्वात मोठी युती केली आहे.

बसपाची जनतेशीच युती

बसपाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि राज्यसभा सदस्य सतीश चंद्र मिश्रा म्हणाले की, त्यांचा पक्ष 2022च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत जनतेशी युती करत आहे. सतीश चंद्र मिश्रा म्हणाले की, भगवान श्रीराम सर्वांचेच आहेत. आम्ही त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहोत. कानपूरच्या बिक्रू प्रकरणात विकास दुबेच्या पुतण्याची पत्नी खुशी दुबे हिच्या जामिनाबद्दल ते म्हणाले की, बाराबंकी कारागृहात बंदी असलेल्या खुशी दुबे यांना आम्ही सर्वतोपरी मदत करू. विकास दुबे यांचे पुतणे, अमर दुबे यांच्या अल्पवयीन विधवेला जामीन मिळण्यासाठी कायदेशीर लढाई लढण्याचे बहुजन समाज पक्षाने ठरवले आहे.

13 टक्के ब्राह्मण आणि 23 टक्के दलित एकत्र आल्यास बसपा सरकार

सतीश चंद्र मिश्रा म्हणाले की, उत्तर प्रदेशात 13 टक्के ब्राह्मण आणि 23 टक्के दलित एकत्र आले तर बसपाचे सरकार येथे निश्चित होईल. यासह बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती पाचव्यांदा राज्याच्या मुख्यमंत्री होतील. बसपच्या कारकीर्दीत राज्यातील कोट्यवधी लोकांनी यापूर्वी संपूर्ण समाजाची प्रगती पाहिली आहे आणि राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीचे कौतुकही केले आहे. बहुजन समाज पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सतीशचंद्र मिश्रा म्हणाले की, ब्राह्मण समाज जिकडे जाईल त्यांचे सरकार स्थापन होईल. उत्तर प्रदेशचा ब्राह्मण समाज गेल्या दहा वर्षांपासून दुर्लक्षित आहे. बहुजन समाज पक्ष आता त्यांना आदर देईल. अयोध्येत आपण आपल्या लाडक्या भगवान श्रीरामांकडे आलो आहोत. आता पुढच्या टप्प्यात आपण प्रयागराज येथे जाऊ आणि वाराणसीतील श्रीकाशी विश्वनाथांच्या भेटीसह पवित्र भूमीला नमन करू.

बसपा ब्राह्मणांना आदर देईल

बहुजन समाज पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सतीशचंद्र मिश्रा म्हणाले की, भाजप आणि सपाने ब्राह्मण समाजाला सोडले, पण मायावतींनी ब्राह्मण समाज सोडला नाही. भाजपमध्ये ब्राह्मण समाजातील लोकांना पिशव्या आणि पुष्पगुच्छ उचलण्यासाठी मंत्री बनवण्यात आले आहे. बहुजन समाज पक्ष आता त्यांना आदर देईल. सतीश चंद्र मिश्रा म्हणाले की, भगवान श्रीराम यांनी भाजपाला चांगले शहाणपण दिले पाहिजे जेणेकरून ते दडपशाहीचा मार्ग सोडून लोकांना न्याय देतील. ते म्हणाले की, बहन मायावती यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात उत्तर प्रदेशमधील कायदा व सुव्यवस्था खूप चांगली होती हे संपूर्ण जगाला ठाऊक आहे. २ जुलैपर्यंत राज्यातील पाच जिल्ह्यांत प्रबुद्ध वर्ग परिषद आयोजित करण्याची बसपाची योजना आहे. त्याचे संयोजक सतीशचंद्र मिश्रा आहेत. हा कार्यक्रम ब्राह्मणांना मुख्य व्यासपीठावर आणण्यासाठी बसपचा मोठा प्रयत्न असल्याचे मानले जाते.

राम मंदिर भूमिपूजनासाठी अशुभ दिवस निवडला होता

राज्यसभा सदस्य सतीश चंद्र मिश्रा म्हणाले की, 5 ऑगस्ट रोजी राम मंदिराचे भूमिपूजन झाले. त्या दिवशी ब्राह्मणांनी प्रश्न उपस्थित केला होता की, ही तारीख कुणी सांगितली. असा अशुभ दिवस निवडला, ज्यामुळे कामच होऊ शकत नाहीये. एक वर्ष झाले तरी मंदिराचा पायाही बांधला जात नाही. मंदिर बांधले जाईल की नाही हा अद्यापही मोठा प्रश्न आहे. ते पुढे म्हणाले की, जर उत्तर प्रदेशमध्ये ब्राह्मण समाजातील लोक जमले तर 2022 मध्ये पूर्ण बहुमताने बसपाचे सरकार स्थापन होईल. 2022 मध्ये जर बसपाचे सरकार स्थापन झाले तर त्यांनी राम मंदिरासाठी गोळा केलेले पैशांनी आम्ही त्यांना राम मंदिर बांधण्यास भाग पाडू. राम मंदिराचे बांधकामही बसपा सरकारच्या मध्येच केले जाईल.

यूपीत दलित आणि ब्राह्मणांवर अत्याचार!

सतीश चंद्र मिश्रा म्हणाले की, उत्तर प्रदेशातील ब्राह्मण समाजातील लोकांना आवाहन आहे की, तुम्ही परशुरामांचे वंशज असाल तर भीती सोडून द्या. तुम्ही टिळा लावता आणि जाणवे घालता. कान्यकुब्ज आणि सरयूपारी ब्राह्मण यांच्यातील फरक विसरा. उत्तर प्रदेशात दलित आणि ब्राह्मणांवर अत्याचार होत आहेत.

BSP Leader Satish Chandra Mishra Calls Brahmin Society To Come With Mayawati For UP Elections 2022

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात