५, १० किंवा १५ वर्षे लागोत केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रांना तुरूंगात घातल्याशिवाय राहणार नाही; राहुल गांधींचा इशारा

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील लखीमपूर हिंसाचार प्रकरणात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा टेनी यांच्या मुलावर शेतकऱ्यांची हत्या केल्याचा ठपका विशेष तपास संस्था एसआयटीने ठेवला आहे. त्यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याशिवाय आम्ही त्यांना सोडणार नाही. इतकंच नाही तर पाच दहा किंवा पंधरा वर्षे लागतो त्यांना तुरुंगात घातल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांनी दिला आहे.Union Minister Ajay Kumar will not stay without Mishra’s imprisonment



संसदेत काँग्रेस पक्षाच्या खासदारांनी हा मुद्दा लावून धरला आहे. लोकसभेत बोलताना राहुल गांधी यांनी अजय कुमार मिश्रा टेनी यांच्या राजीनाम्याची तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना बडतर्फ करण्याची मागणी केली. परंतु, सरकार तसे करणार नसेल तर आम्ही संघर्ष करू. मंत्र्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. यानंतर संसदेत लोकसभेत गदारोळ झाला सभापती ओम बिर्ला यांनी कामकाज स्थगित केले.

त्यानंतर बाहेर येऊन राहुल गांधींनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. लखीमपूर हिंसाचारासाठी जबाबदार असणाऱ्या मंत्र्यांवर कठोर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही. मोदी सरकारला कृषी कायदे मागे घ्यावे लागतील,हे मी आधीच सांगितले होते. आता त्यांनी ते माग कायदे मागे घेतले आहेत. शेतकऱ्यांची माफी मागितली आहे. पण जेव्हा नुकसानभरपाई देण्याची वेळ आली तेव्हा हात आखडता घेत आहेत. आताही मी सांगतो मोदींना केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा घ्यावाच लागेल, नाहीतर आम्ही संघर्ष करून त्यांना तसे करण्यास भाग पाडू. एवढेच नाही, तर पाच वर्षे पाच दहा किंवा पंधरा वर्षे लागोत संबंधित मंत्र्याला शेतकऱ्यांच्या हत्येबद्दल तुरुंगात घातल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा इशारा देखील राहुल गांधी यांनी दिला आहे.

Union Minister Ajay Kumar will not stay without Mishra’s imprisonment

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात