क्वारंटाईनचे नियम मोडून आलिया भट्ट पोहचली दिल्लीत , गुरूद्वारमध्ये घेतले दर्शन ; ब्रम्हास्त्र सिनेमाचे मोशन पोस्टर केले रिलीज


क्वारंटाईनचे नियम मोडून आलिया भट्ट दिल्लीला गेली. त्यामुळे आलियावर कारवाई होण्याची शक्यता आहे.Alia Bhatt arrives in Delhi, breaks quarantine rules, pays obeisance at Gurudwara; Motion poster of Brahmastra movie released


विशेष प्रतिनिधी

मुंबई : ‘कभी खुशी कभी गम’ या सिनेमाला 20 वर्षे पूर्ण झाल्याने करण जोहरने त्याच्या घरी पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीनंतर अभिनेत्री करीना कपूर, अमृता अरोरा, महिप कपूर आणि सीमा खान यांना कोरोनाची लागण झाली.

या पार्टीत आलिया भट्ट देखील सामील होती.आलिया भट्ट हीचा कोरोना अहवाल निगेटिव्ह होता पण तिला क्वारंटाईन होण्यासाठी सांगण्यात आलं होतं. मात्र, क्वारंटाईनचे नियम मोडून आलिया भट्ट दिल्लीला गेली. त्यामुळे आलियावर कारवाई होण्याची शक्यता आहे.आलिया बॉलिवूड दिग्दर्शक आर्यन मुखर्जीसोबत दिल्लीत गुरूद्वारमध्ये दर्शनासाठी गेली होती.दरम्यान यावेळी तिने तिच्या आगामी ब्रम्हास्त्र सिनेमाचे मोशन पोस्टर रिलीज केले.आलिया भट्ट चार्टर विमानाने आज दिल्लीहून मुंबईला परतणार आहे. आलिया मुंबईत येताच महापालिकेचे आरोग्य विभागाचे अधिकारी आलियावर कारवाई करण्याची शक्यता आहे.

Alia Bhatt arrives in Delhi, breaks quarantine rules, pays obeisance at Gurudwara; Motion poster of Brahmastra movie released

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती