भारतीय मेजरचा चीनी सैनिकाला सवाल, तुला लाज नाही वाटत?


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : तुला लाज वाटत नाही, असा थेट सवाल भारतीय मेजरने एका चीनी सैनिकाला केला. याचे कारण म्हणजे तिबेटी असलेला हा सैनिक चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीमध्ये चीनी राष्ट्रध्वज घेऊन उभा होता. या सवालावर या चीनी सैनिकाची बोलती बंद झाली.Indian Major’s question to Chinese soldier, don’t you feel ashamed?

भारत- चीन सीमेवरील एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. हा कधीचा किंवा कोणत्या ठिकाणाचा आहे हे त्यात कळत नाही. परंतु, चीनी सैनिकाने पीपीई किट घातलेले असल्याने कोरोना काळातीलच असल्याचे दिसत आहे. एक मिनिटापेक्षा कमी कालावधीच्या या व्हिडीओमध्ये चीनी आणि भारतीय सैन्य समोरासमोर आहे. दोन्ही सैनिकांनी आपापले राष्ट्रध्वज हातात घेतले आहे.यावेळी चीनी सैनिक भारतीय अधिकाऱ्याला विचारतो तुझे नाव काय आहे? त्यावर भारतीय उत्तर देतो मेजर कीन कुमार. यामध्येही गमंत आहे. सीमेवरील सैनिकांच्या परस्पर संवादात कधीही स्वत:चे खरे नाव सांगत नाहीत. त्यामुळे भारतीय अधिकाऱ्याने हे उत्तर दिले.

सैन्य प्रशिक्षण अकादमीत हुशार प्रशिक्षणार्थींना कीन कुमार असे म्हटले जाते. सोशल मीडियावर भारतीय अधिकाऱ्याच्या समयसुचकतेचेही कौतुक केले जात आहे. त्याचबरोबर हे अधिकारी कोण आहेत याबाबतही अनेकांनी उत्सुकता व्यक्त केली आहे.

Indian Major’s question to Chinese soldier, don’t you feel ashamed?

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था