ममतादीदी उघडपणे मोदींची दलाली करताहेत; अधीर रंजन चौधरी यांचा थेट हल्लाबोल!!


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या जरी 2024 मध्ये भाजपचा “खेला होबे” असे म्हणत असल्या तरी त्या सरळ सरळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दलाली करत आहेत, अशा शेलक्या – तिखट शब्दांत मध्ये काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते खासदार अधीर रंजन चौधरी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.Mamata is agent of PM Modi, Alleged Adhir ranjan Chaudhary

ममता बॅनर्जी यांनी गोव्यातून नुसती काँग्रेसच फोडली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारही फोडले आहेत. या पार्श्‍वभूमीवर अधीर रंजन चौधरी यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. गोव्याच्या दौऱ्यात ममता बॅनर्जी यांनी भाजपला प्रत्येक राज्यात पराभूत करण्याची प्रतिज्ञा केली आहे.या संदर्भात एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना अधीर रंजन चौधरी म्हणाले, की ममता बॅनर्जी या कितीही “खेला होबे” म्हणत असल्या तरी त्या सरळ सरळ पंतप्रधान मोदी यांची दलाली करत आहेत. विरोधी पक्षांचे ऐक्य मोडीत काढण्यासाठी त्या सर्व ते प्रयत्न करत आहेत. त्यांना विरोधकांचे ऐक्य नकोच आहे.

मोदींची खुशामत करून त्यांना आपली सत्ता बंगालमध्ये टिकवायची आहे. आणि मुख्य म्हणजे कोळसा घोटाळ्यासारख्या बड्या भ्रष्टाचारातून आपला पुतण्या खासदार अभिषेक बॅनर्जी याला वाचवायचे आहे. मोदी खुश झाले की अभिषेक बॅनर्जी वाचणार हे उघड आहे, असा टोलाही खासदार अधीर रंजन चौधरी यांनी लगावला आहे.

अधीर रंजन चौधरी यांनी ममता बॅनर्जी यांना राजकीयदृष्ट्या टार्गेट करणे हे काही पहिल्यांदा घडलेले नाही. त्यांनी आजपर्यंत अनेकदा ममता बॅनर्जी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. परंतु त्या थेट मोदींची दलाली करतात, एवढा तिखट हल्ला त्यांनी आजपर्यंत कधी केला नव्हता. तो आज त्यांनी करून घेतला आहे.

Mamata is agent of PM Modi, Alleged Adhir ranjan Chaudhary

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती