Pune : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर ! प्रवरा इथे देशातली पहिली सहकार परिषद …शिर्डीत घेणार साईबाबांचे दर्शन …


अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याबाबत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी माहिती दिली आहे.


अमित शाह शिर्डीलाही भेट देणार आहेत, ते साईबाबाचे दर्शन घेणार आहेत.


पुण्यात ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे भूमिपूजन करणार आहेत, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण हे त्यांच्या हस्ते होणार आहे.


अमित शाह सहकार क्षेत्रासंदर्भात या परिषदेत काही महत्त्वाच्या घोषणा करणार का, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.


विशेष प्रतिनिधी

पुणे : भारताचे गृहमंत्री अमित शाह लवकरच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत, तसेच ते रविवारी पुण्यात असणार आहेत. अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याबाबत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी माहिती दिली आहे. पुणेनंतर ते शिर्डीत साईबाबांचे देखील दर्शन घेणार आहेत.Pune: Union Home Minister Amit Shah to visit Pune on Sunday! Sai Baba to visit Shirdi …

पुण्यात ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे भूमिपूजन करणार आहेत, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण हे त्यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यावेळी उपस्थित राहणार आहेत.

राज्यात सहकारी कारखाना आणि भ्रष्टाचाराबाबत राजकीय क्षेत्रात आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच शाह यांचा हा दौरा आहे.

अमित शाह देशाचे सहकारमंत्री झाल्यानंतर सहकार क्षेत्रात मोठे बदल होणार असल्याच्या चर्चा उठल्या होत्या आणि पुणे हे सहकार क्षेत्राचे हब मानले जाते, त्यामुळे अमित शाह यांच्या या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

प्रवरा इथे देशातली पहिली सहकार परिषद

सहकाराची सुरूवात झालेल्या प्रवरा इथं देशाची पहिली सहकार परिषद होणार आहे तसंच विचारमंथनही होणार आहे. भाजपा आमदार राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे-पाटील यांनी या सहकार परिषदेचं आयोजन केलंय.

सहकार क्षेत्रातली तज्ज्ञ मंडळी या परिषदेत सहभागी होणार आहे.

 

Pune: Union Home Minister Amit Shah to visit Pune on Sunday! Sai Baba to visit Shirdi …

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात