बीडला आलात तर पाहू, धनंजय मुंडे यांची तक्रार करण्यासाठी येत असलेल्या किरीट सोमय्या यांना धमक्या


विशेष प्रतिनिधी

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढत आहेत. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची जगमित्र शुगर्स प्रकरणी इडीकडे तक्रार केल्यानंतर गुरूवारी (दि.16 डिसेंवर) बीड दौऱ्यावर येत असलेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांना आता ‘बीडला आलात तर पाहू’If you come to Beed, let’s see, threats to Kirit Somaiya who is coming to complain about Dhananjay Munde

धमकीचे व अश्लील भाषा वापरून मेसेज येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.सोमय्या यांनी आपल्या सोशल मिडिया अकाउंट वरून या प्रकाराची माहिती दिली आहे. धनंजय मुंडे संस्थापक असलेल्या जगमित्र शुगर्स या खासगी साखर कारखान्याच्या जमीन खरेदी प्रकरणातील घोटाळ्याबाबत 2019 मध्ये फसवणूकीचा गुन्हा मुंडेंसह इतरांवर दाखल झाला होता.



या प्रकरणाबाबत किरीट सोमय्या यांनी बुधवारी मुंडे यांची इडी कडे तक्रार केली. सोमय्या अंबाजोगाई दौऱ्यावर येत असून कारखाना जागेची पहाणी, बदार्पूर पोलिस ठाण्याला भेट व नंतर आमदार नमिता मुंदडा यांच्या निवास स्थानी पत्रकार परिषद असा त्यांचा दौरा आहे.

त्यांनी हा दौरा जाहीर करताच त्यांना बीडमधून धमकीचे फोन व मेसेज जात असल्याचे समोर आले. सोमय्या यांनी त्यांना आलेले मेसेज, तो पाठवणाºया व्यक्तीचा धनंजय मुंडेंसोबतचा फोटो व मोबाईल क्रमांक आपल्या सोशल मिडिया अकाउंट वरुन शेअर करून या प्रकाराची माहिती दिली आहे.

If you come to Beed, let’s see, threats to Kirit Somaiya who is coming to complain about Dhananjay Munde

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात