किरीट सोमय्या म्हणाले, अजित पवार तुरूंगात जाणार हा एक शब्दप्रयोग

राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तुरुंगात टाकण्याचा इशारा देणारे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ‘हा केवळ एक शब्दप्रयोग आहे, तुरुंगात जाणं म्हणजेच कारवाई होणे, एवढेच अपेक्षित आहे,’ असे सांगितले. Kirit Somaiya said that Ajit Pawar will go to jail is a term


विशेष प्रतिनिधी

पिंपरी : राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तुरुंगात टाकण्याचा इशारा देणारे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ‘हा केवळ एक शब्दप्रयोग आहे, तुरुंगात जाणं म्हणजेच कारवाई होणे, एवढेच अपेक्षित आहे,’ असे सांगितले.

किरीट सोमय्या पिंपरी-चिंचवड शहरात आले होते. त्यावेळी ‘‘अजित पवार यांना तुरूंगात टाकणार, अशी टीका आपण करता. त्यांना अजून काही तुरूंगात टाकले नाही. भाजपचाच अजित पवारांना पाठिंबा आहे का?’’ या प्रश्नावर सोमय्या म्हणाले, ‘‘तुरुंगात जाणार या वक्तव्याकडे शब्दप्रयोग म्हणून पाहावे. तुरुंगात जाणे म्हणजेच कारवाई होणे आणि अशी कारवाई झाल्यावर तुम्ही माझं कौतुक तरी करा, उपमुख्यमंत्री अजित पवार तुरुंगात जाणार हा एक शब्दप्रयोग आहे. सर्वांना तुरुंगात टाकणं शक्य नाही.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यातील मंत्र्यांवर टीका करताना सोमय्या म्हणाले, ‘महाराष्ट्रात नटसम्राट एकच होता, पण ते पद आता यांना द्यावं लागेल. बहीण नाही तर अजित पवारांनी आपल्या आईच्या नावावरही बेनामी इस्टेट जमा केली आहे. भावना गवळी यांनी सरकारचे ४४ कोटी ढापले, आनंदराव अडसूळ यांनी १०० कोटींचा घोटाळा केला. त्यासाठी त्यांना नोटीस दिल्या गेल्या. यावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार काहीच का बोलत नाहीत. मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्नीच्या नावे १९ बंगले बांधले आहेत.

खासदार संजय राऊत यांनी बेनामी ५५ लाख परत करून माफी मागितली आहे. जालना सहकारी साखर कारखाना घोटाळा प्रकरण उघडकीस आले आहे. या कारखान्याचे मालक अर्जुन खोतकरच असल्याचे पुरावे आहेत. सोमय्या म्हणाले, ‘जालना सहकारी साखर कारखाना विकत घेण्यासाठी अर्जुन शुगर इंडस्ट्रीकडूनच खोतकर यांनीच तापडिया ग्रुपला ३१ कोटींचा धनादेश दिला. पुन्हा तापडिया ग्रुपकडून तो ४२ कोटींना विकत घेतला. शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकरांनी त्यांचा मुरुडमधला अनधिकृत बंगला स्वत:च पाडला.’

Kirit Somaiya said that Ajit Pawar will go to jail is a term

महत्त्वाच्या बातम्या