वंचित बहुजन आघाडी व भाजपच्या आंदोलनाची अमरावती प्रशासनाने घेतली धास्ती ; पुन्हा एकदा संचार बंदीचे आदेश

शहरात सकाळी ९ ते संध्याकाळी ६ पर्यंत कडक संचारबंदी लागू करण्यात आली असून ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. Amravati administration threatens deprived Bahujan Aghadi and BJP’s agitation; Once again a communication ban order


विशेष प्रतिनिधी

अमरावती : काही दिवसांपूर्वी अमरावतीत त्रिपुरामध्ये घडलेल्या घटनेचे पडसाद उमटलेले दिसले. अमरातवीत बंदला हिंसक वळण लागून हिंसाचाराचं वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर अमरावतीमध्ये कलम १४४ लागू करुन जमाबंदीचे आदेश देण्यात आले होते.

दरम्यान हळूहळू परिस्थिती आटोक्यात आली असताना नागरिकांना निर्बंधांमधून शिथिलता देण्यात आली होती.
परंतु आता पुन्हा एकदा राजकीय पक्षांचे नेते आंदोलन करत असल्याने त्या आंदोलनाची प्रशासनाने धास्ती घेतल्याचं चर्चा सध्या सुरू आहे.दरम्यान आज अमरावती शहरात पुन्हा एकदा संचार बंदीचे आदेश देण्यात आले आहेत.शहरात सकाळी ९ ते संध्याकाळी ६ पर्यंत कडक संचारबंदी लागू करण्यात आली असून ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.आता नागरिकांना आणखी काही दिवस निर्बंधांमध्ये राहावं लागणार असल्याचं दिसून येत आहे.

शहरातील परिस्थिती नियंत्रणात राहावी, यासाठी पोलिसांनी कंबर कसल्याचं अमरावतीमध्ये दिसून येत आहे.संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन करून बाहेर पडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी सुधारित आदेश काढून स्पष्ट केलं आहे.

Amravati administration threatens deprived Bahujan Aghadi and BJP’s agitation; Once again a communication ban order

महत्त्वाच्या बातम्या