अखेर त्रिपुरामध्ये नेमके काय घडले?, का भडकला महाराष्ट्रात हिंसाचार? बांग्लादेश-पाकिस्तान कनेक्शन काय? वाचा सविस्तर…

what happened in Tripura, due to which violence in Maharashtra, know Bangladesh and pakistan connection

violence in Maharashtra : महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी हिंसाचार उसळला. हिंदुत्ववादी संघटनेने पुकारलेल्या बंददरम्यान अज्ञातांनी दगडफेक केली आणि दुकानांची तोडफोड केली. परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेत आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज केला. आता अमरावतीत चार दिवसांसाठी कलम 144 लागू करण्यात आले असून इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. what happened in Tripura, due to which violence in Maharashtra, know Bangladesh and pakistan connection


प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी हिंसाचार उसळला. हिंदुत्ववादी संघटनेने पुकारलेल्या बंददरम्यान अज्ञातांनी दगडफेक केली आणि दुकानांची तोडफोड केली. परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेत आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज केला. आता अमरावतीत चार दिवसांसाठी कलम 144 लागू करण्यात आले असून इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे.

शुक्रवारीही उसळला हिंसाचार

याआधी शुक्रवारी महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये काही मुस्लिम संघटनांनी मोर्चे काढले. यामध्ये दगडफेकीच्या घटनाही घडल्या आहेत. या घटना प्रामुख्याने अमरावती, मालेगाव आणि नांदेड शहरात घडल्या. या प्रकरणांमध्ये, पोलिसांनी किमान 20 एफआयआर नोंदवले आणि 20 लोकांना अटक केली. खरे तर, काही दिवसांपूर्वी त्रिपुरामध्ये झालेल्या जातीय हिंसाचाराच्या निषेधार्थ मुस्लिम संघटनांनी रॅली काढली, त्यात हिंसाचार उसळला. यासाठी रझा अकादमीवर आरोप केले जात आहेत.

बांग्लादेश कनेक्शन काय?

त्रिपुरामध्ये असे काय घडले आहे की, हिंसाचाराची धग महाराष्ट्रापर्यंत पोहोचला आहे, याबद्दल जाणून घेणे गरजेचे आहे. वास्तविक, या बिघडलेल्या वातावरणाचे मूळ शेजारील बांग्लादेशात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 15 ऑक्टोबर रोजी अतिरेक्यांनी बांगलादेशातील दुर्गा पूजा पंडाल आणि मंदिरांची तोडफोड केली. तेव्हापासून बांगलादेशात वेगवेगळ्या ठिकाणी हिंदूंवर हल्ले झाल्याच्या बातम्या येत आहेत. याच्या निषेधार्थ धार्मिक संघटनांनी त्रिपुरात मोर्चे काढले. यादरम्यान जमावाने काही ठिकाणी हिंसक वळण घेत दुकाने, घरे आदींची तोडफोड केली. तथापि, त्रिपुरा पोलिसांनी तेथे असा कोणताही प्रकार झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

वास्तविक, शुक्रवारच्या नमाजानंतर नांदेड, नाशिक, मालेगाव, अमरावती आणि वाशीममध्ये दंगलखोरांनी पोलिसांवर दगडफेक केली आणि दुकाने आणि वाहनांची तोडफोड केली. त्रिपुरातील एका मशिदीचे कथित नुकसान झाल्याच्या वृत्तानंतर हिंसाचार झाला, ज्यामध्ये त्रिपुरा सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की तेथे कोणत्याही मशिदीचे नुकसान झाले नाही. त्रिपुरा पोलीस तपास करत आहेत की, मशिदीच्या विध्वंसाची खोटी बातमी कोणी आणि कोणत्या उद्देशाने पसरवली.

त्रिपुरा पोलिसांना बनावट पोस्ट सापडली

त्रिपुरा पोलिसांना काही ट्विटर हँडल मिळाले आहेत, ज्याद्वारे खोट्या बातम्या पसरवल्या जात होत्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आतापर्यंतच्या तपासादरम्यान खोट्या बातम्या पसरवणाऱ्या ट्विटरच्या ९४ लिंक्स आढळून आल्या आहेत, त्यापैकी ४७ लिंक काढून टाकण्यात आल्या आहेत. पोलिसांना २४ बनावट पोस्ट सापडल्या, तर ६६ आक्षेपार्ह पोस्ट सापडल्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फेसबुकवर खोट्या बातम्या पसरवणाऱ्या ३२ लिंक्स आढळून आल्या, त्यापैकी १३ फेक पोस्ट आहेत तर १९ आक्षेपार्ह आहेत. यूट्यूबवर दोन आक्षेपार्ह लिंक्सही सापडल्या होत्या, त्यापैकी एक काढून टाकण्यात आली आहे.

पाकिस्तानी कनेक्शन काय?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्रिपुरा पोलिसांना सोशल मीडियावर मशिदीच्या नुकसानीची खोटी माहिती पसरवल्याच्या एकूण 128 लिंक सापडल्या आहेत, त्यापैकी 37 बनावट पोस्ट आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे यामध्ये पाकिस्तानी कनेक्शनही समोर येत आहे. खरं तर, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिपुरा पोलिसांना UAPA यादीमध्ये समाविष्ट असलेल्या ट्विटर खात्याची पाकिस्तानी लिंक सापडली आहे, जी पाकिस्तानच्या JeI दहशतवादी नेटवर्कशी जोडलेली आहे. हे ट्विटर अकाउंट भारतविरोधी कारवायांमध्ये सक्रिय असल्याचे आढळून आले आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील सर्व पक्षीय नेत्यांनी जनतेला अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. अमरावतीत संचारबंदी लागू केल्यानंतर तेथे तणावपूर्ण शांतता असून राज्यातील इतर जिल्ह्यांतही परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात येत आहे.

what happened in Tripura, due to which violence in Maharashtra, know Bangladesh and pakistan connection

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात