राज्यातील दंगलीवरून रझा अकादमी पुन्हा चर्चेत : जाणून घ्या रझा अकादमीशी संबंधित आतापर्यंतच्या वादग्रस्त घटना

Controversies Related To Raza Academy, Organization Now Accused In Maharashtra Violence Related To Tripura Effect

Controversies Related To Raza Academy : त्रिपुरातील हिंसाचाराच्या अफवेमुळे महाराष्ट्रातील अमरावती, नांदेड आणि मालेगाव या तीन शहरांमध्ये हिंसाचार उसळला. दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे यांनी रझा अकादमीला दहशतवादी संघटना म्हणत तिच्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. अमरावती, नांदेड आणि मालेगाव येथील हिंसाचाराला रझा अकादमी जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे रझा अकादमी काय आहे याबद्दल जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. तथापि, रझा अकादमी चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही, यापूर्वीही या संघटनेने वेळोवेळी वाद ओढवून घेतले आहेत. Controversies Related To Raza Academy, Organization Now Accused In Maharashtra Violence Related To Tripura Effect


प्रतिनिधी

मुंबई : त्रिपुरातील हिंसाचाराच्या अफवेमुळे महाराष्ट्रातील अमरावती, नांदेड आणि मालेगाव या तीन शहरांमध्ये हिंसाचार उसळला. दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे यांनी रझा अकादमीला दहशतवादी संघटना म्हणत तिच्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. अमरावती, नांदेड आणि मालेगाव येथील हिंसाचाराला रझा अकादमी जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे रझा अकादमी काय आहे याबद्दल जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. तथापि, रझा अकादमी चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही, यापूर्वीही या संघटनेने वेळोवेळी वाद ओढवून घेतले आहेत.

रझा अकादमीशी संबंधित वादग्रस्त घटना

१. 1988 मध्ये संस्थेने सॅटॅनिक व्हर्सेस या पुस्तकाचे लेखक सलमान रश्दी यांच्या विरोधात फतवा काढला होता. या फतव्यानंतर संघटना चर्चेत आली होती.

२. भारत आणि इस्रायल यांच्यातील 1992 च्या राजकीय कराराच्या निषेधार्थ संघटनेने मुंबईत मोर्चा काढला होता. अकादमीने तत्कालीन पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव आणि तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांना इस्रायलसोबतचा करार मोडण्याची विनंती केली होती.

३. संघटनेने यापूर्वी मुंबईत तस्लिमा नसरीन आणि मुहम्मद ताहिर-उल-कादरी यांच्या कार्यक्रमांचा निषेध केला होता.

४. रझा अकादमी 11 नोव्हेंबर 2012 रोजी पहिल्यांदा वादात सापडली होती. मुंबईतील आझाद मैदानावर रॅली काढण्यात आली. म्यानमार आणि आसाममध्ये मुस्लिमांवरील हिंसाचाराच्या निषेधार्थ ही रॅली काढण्यात आली. त्यावेळी काही मौलवींनी येथे प्रक्षोभक भाषणे दिली. यानंतर आझाद मैदानात जोरदार तोडफोड करण्यात आली. जमावाने मीडिया आणि पोलिसांना लक्ष्य केले होते. यानंतर मैदानाबाहेर अमर जवान ज्योतीचेही नुकसान झाले. शेजारी उभ्या असलेल्या गाड्या जाळल्या. महिला पोलिसांवरही हल्ला करण्यात आला. या हिंसाचारात 44 पोलिसांसह 50 जण जखमी झाले आहेत. दोन जणांचा मृत्यूही झाला.

५. सन 2015 मध्ये रझा अकादमीने प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमान आणि इराणी चित्रपट निर्माता माजिद माजिदी यांच्याविरुद्ध इस्लाम धर्माच्या प्रेषितांवर चित्रपट बनवल्याबद्दल फतवा जारी केला.

६. सन 2018 मध्ये ‘ओरु अदार लव्ह – माणिक्य मलाराया पूवी’ मधील एका व्हायरल गाण्याच्या सार्वजनिक प्रसारावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती, यात प्रेषित मोहम्मद आणि त्यांच्या पत्नीचा अवमान केल्याचा आरोप होता.

७. कोरोनाच्या काळात युद्धपातळीवर तयारी करताना देशाने लस विकसित केली. लस जगभर पाठवून त्यांनी मानवतेचा आदर्श घालून दिला. परंतु रझा अकादमीचे प्रमुख सईद नूरी यांनी या लसीवर शंका व्यक्त केली आणि ३० जानेवारी २०२० रोजी थेट जागतिक आरोग्य संघटनेला पत्र लिहून या लसीमध्ये डुकराची चरबी आहे की नाही हे तपासण्यास सांगितले. तसे असल्यास कोणत्याही मुस्लिम व्यक्तीने ही लस घेऊ नये, असे आवाहन केले.

८. याशिवाय कोरोनामुळे 23 मार्च 2020 पासून सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली होती. यावर सईद नूरी यांनी पत्र लिहून राजभवनात नमाज अदा करण्याची परवानगी मागितली आहे. या बदल्यात हिंदु जनजागृती समितीनेही राज्यपालांना राजभवनात पूजा करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी पत्र लिहून केली होती.

९. रझा अकादमीने जुलै २०२० मध्ये ‘द मेसेंजर ऑफ गॉड’ या चित्रपटावर बंदीची मागणी केली होती. या चित्रपटामुळे मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावतील, असं रझा अकादमीचं म्हणणं होतं. खरंतर, इराणमधील दिग्दर्शक माजिद माजिदी यांनी २०१५ मध्ये बनवलेल्या या चित्रपटावर इस्लामी देश असलेल्या इराणमध्येही बंदीची मागणी केली गेलेली नाही. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रझा अकादमीच्या मागणीची तातडीनं दखल घेत केंद्र सरकारकडे बंदीसाठी पाठपुरावा सुरू केला होता. यातून सत्ताधारी आघाडीला विशिष्ट धर्मीयांचे लांगुलचालन करायचे आहे, हे स्पष्ट होत असल्याचा आरोपही तेव्हा विरोधकांनी केला होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हयातभर अल्पसंख्याकांच्या लांगुलचालनाला कडाडून विरोध केला होता, यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बाळासाहेबांच्या भूमिकेचे विस्मरण झाल्याचा आरोपही विरोध केला होता.

१०. स्वीडिश व्यंगचित्रकार लार्स विक्स यांच्या मृत्यूनंतर, रझा अकादमीने 5 मे 2021 रोजी त्यांचा मृत्यू साजरा केला. कारण लार्स विक्सने प्रेषित मोहम्मद यांचे व्यंगचित्र काढले होते.

११. फेब्रुवारी २०२१ मध्ये प्रेषित मोहम्मद यांचे चित्र प्रकाशित केल्याबद्दल बीबीसीविरुद्ध आक्षेप घेतला आणि तक्रार दाखल केली होती. बीबीसीचे संपादक मुकेश शर्मा यांनी रझा अकादमीचे सरचिटणीस मौलाना सईद नूरी यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले होते की, बीबीसीने आधीच व्हिडिओ सुधारित केला आहे आणि मुस्लिमांच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या बाबी काढून टाकल्या आहेत.

१२. आता नोव्हेंबर 2021 मध्ये त्रिपुरातील हिंसाचाराच्या घटनेवरून महाराष्ट्रभरात विविध ठिकाणी हिंसक आंदोलने, दंगलीचा आरोप रझा अकादमीवर होत आहे. यावरून या संघटनेवर बंदी घालण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

रझा अकादमीने आरोपांवर काय म्हटले?

सध्याच्या दंगलींच्या आरोपांवर रझा अकादमीचे अध्यक्ष सईद नूरी माध्यमांना म्हणाले, “आम्ही आमच्या कोणत्याही सदस्याला हिंसाचार किंवा दंगली पसरवण्याचा आदेश दिलेला नाही. बंद शांततेत पार पडणार असल्याचे सांगण्यात आले. दंगलखोर प्रत्येक गर्दीत सामील होतात. पोलिसांनीही तपास करावा, आम्हीही मदत करू. दोषींना सोडता कामा नये. राजकीय पक्ष काहीही म्हणोत. निवडणूक जवळ आली आहे. इंग्रजांचे फूट पाडा आणि राज्य करा हे धोरण अवलंबले जात आहे. नूरी पुढे म्हणाले, ‘या सर्व राजकीय गोष्टी आहेत. आंदोलन शांततेत करण्याचे सांगण्यात आले. वसीम रिझवी यांनी लिहिलेल्या पुस्तकात आमच्या पैगंबराला शिवीगाळ करण्यात आली आहे. त्यांची बदनामी करण्यात आली आहे. रिझवी यांच्यावर कारवाई झाली असती, तर हे सर्व घडले नसते. बंदी लादण्याच्या मागणीवर बोलताना सईद नूरी म्हणाले, ‘जे बंदुकांचे वाटप करत आहेत. ते दंगली घडवून आणतात, त्यांच्याबद्दल कोणी बोलत नाही. आम्ही गरीब लोक आहोत. गरिबांचा प्रश्न मांडावा. जो दुर्बल आहे त्याला लोक दाबतात.”

Controversies Related To Raza Academy, Organization Now Accused In Maharashtra Violence Related To Tripura Effect

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात