School Reopen: आज नागपूर तर सोमवारपासून औरंगाबादच्या शाळांची घंटा वाजणार ! कडक नियम-पालक मात्र संभ्रमात


विशेष प्रतिनिधी

नागपूर : नागपुरमध्ये दोन वर्षानंतर पुन्हा एकदा शाळेची घंटा वाजणार आहे. पहिले ते सातवीपर्यंत वर्ग सुरू करण्यास मान्यता मिळाल्यानंतर, आजपासून शहरात शाळा सुरू करण्यात येत आहेत.काल मुंबईच्या शाळा उघडण्यात आल्या तर सोमवारपासून औरंगाबादच्या देखील शाळा उघडण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे .School bells will ring in Nagpur today and in Aurangabad from Monday

कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून, सुरक्षीत वातावरणात शाळा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिली. आजपासून शाळा सुरू होत असल्याने विद्यार्थांमध्ये देखील उत्साह असल्याचे पहायला मिळत आहे. 

कोरोनाची तिसरी लाट आणि ओमिक्रॉन विषाणूचं संकट असूनही पूर्ण खबरदारी बाळगत अखेर औरंगाबाद महानगरपालिकेने येत्या सोमवारपासून शहरातील शाळांचे पहिली ते सातवीचेही वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सोबतच महापालिकेने शाळांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. प्रत्येक बाकावर एक विद्यार्थी तर दोन बाकांमध्ये सहा फुटांचे अंतर असावे, अशी व्यवस्था करण्याच्या सूचना शाळा व्यवस्थापनाला देण्यात आल्या आहेत.

शाळा व्यवस्थापनाने मुलांच्या स्वागताची तयारीही सुरु केली आहे, मात्र पालकांमध्ये मुलांना शाळेत पाठवावे की नाही याबाबत अजूनही संभ्रम आहे.मराठवाड्यात लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात ओमिक्रॉन विषाणूचा शिरकाव झाल्याने पालकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत.

त्यातच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांवर जास्त परिणाम होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आल्याने मुलांना शाळेत पाठवावे की नाही, असा प्रश्न पालकांसमोर उभा राहिला आहे. मागील वर्ष ऑनलाइन शिक्षणाद्वारे काढले असल्याने हेही वर्ष त्याच पद्धतीने शिक्षण सुरु रहावे, असे काही पालकांना वाटते.

School bells will ring in Nagpur today and in Aurangabad from Monday

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती