गुगल कंपनीने कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण केले बंधनकारक


गुगलने कर्मचाऱ्यांना लसीकरण न केल्यास वेतन कपातीपासून ते बडतर्फीपर्यंतची कारवाई करणार असे नियम लागू केले आहेत.Google makes coronary vaccination mandatory for employees


विशेष प्रतिनिधी

न्यूयॉर्क : सरकारने सगळ्यांना कोरोना लसीकरण बंधनकारक केले आहे. दरम्यान सर्व कंपन्यांनी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लसीकरण बंधनकारक केले आहे.अशातच गुगल कंपनीने देखील कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करून घेणे बंधनकारक केले आहे. गुगलने कर्मचाऱ्यांना लसीकरण न केल्यास वेतन कपातीपासून ते बडतर्फीपर्यंतची कारवाई करणार असे नियम लागू केले आहेत.

तसेच कोविड लस घेतल्याचे प्रमाणपत्र सादर करणे कर्मचाऱ्यांना बंधनकारक करण्यात आहे. प्रमाणपत्र सादर करण्यासाठी ‘गुगल’ने ३ डिसेंबर ही अंतिम तारीख दिली होती. त्यासाठी कर्मचाऱ्यांना मेमो देण्यात आले होते.दरम्यान या तारखेनंतर कोणत्याही कर्मचाऱ्याचे प्रमाणपत्र किंवा लस न घेतल्याचे कारण स्वीकारले जाणार नाही, असेही गुगल कंपनीकडून सांगण्यात आले होते.



ज्या कर्मचाऱ्यांनी लस घेतल्याचे प्रमाणपत्र सादर केले नाही, त्यांना १८ जानेवारीपासून ३० दिवसांच्या सक्तीच्या सुट्टीवर पाठवण्यात येईल.लस घेतली नाही तर ज्या कारणासाठी लस घेतली नाही, ते कारण लिखित स्वरूपात सादर करण्यास कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Google makes coronary vaccination mandatory for employees

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात