दुर्दैवी! बिहारच्या भोजपूरमध्ये सेल्फी काढण्याच्या नादात पाच मुली सोन नदीत बुडाल्या

तिघींचे मृतदेह सापडले तर अन्य दोन मुलींचा शोध सुरू आहे.

विशेष प्रतिनिधी

 भोजपूर : सेल्फी काढताना सोन नदीत पाच मुली बुडाल्या. यातील तिघींचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अन्य दोन मुलींचा शोध सुरू आहे. बिहारमध्ये सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात पाच मुलींचा बुडून मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना आहे. Unfortunate Five girls drowned in Son river while taking selfies in Bihars Bhojpur

या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जवळच लोकांची गर्दी होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. SDRF टीम आणि स्थानिक  मदतीने नागरिकांच्या मदतीने पोलिस इतर दोन मुलींचा शोध घेत आहेत.

चांडी पोलीस स्टेशन हद्दीतील चांडी बहियारा गावात ही दुर्घटना घडली. सोननदीतील बुडालेल्या तीन मुली एकाच कुटुंबातील आहेत आणि अन्य दोन मुली नातेवाईक आहेत. तेथे उपस्थित लोकांचे म्हणणे आहे की, सर्व मुली अंघोळ करून एकत्र सेल्फी घेत होत्या. तेव्हा त्यातील एकजण घसरली आणि पडू लागली. तिला खोलवर जाताना पाहून दुसरी मुलगी तिला वाचवण्यासाठी गेली. अशातच एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात पाचही मुली खोल पाण्यात पडल्या आणि नदीच्या जोरदार प्रवाहात वाहू लागल्या. नदीच्या जोरदार प्रवाहात त्या वाहून गेल्याचे पाहून तेथे उपस्थित पुजारी व महिलांनी आरडाओरडा सुरू केला, मात्र कोणी काही करण्याआधीच पाचही मुली नदीच्या जोरदार प्रवाहात वाहून गेल्या.

Unfortunate Five girls drowned in Son river while taking selfies in Bihars Bhojpur

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात