प्रतिनिधी
मुंबई : नांदेड, छत्रपती संभाजी नगर मधल्या सरकारी रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाले. त्यात सरकारी यंत्रणा वर्षानुवर्षे ढिसाळ असल्याचे स्पष्ट झाले, पण या मुद्द्यावरून शिंदे – फडणवीस सरकारमधील आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्यावर टीका करताना रोहित पवारांची जीभ मात्र घसरली. Rohit pawar says to tanaji sawant news
अख्खा महाराष्ट्र भिकारी होईल, पण तानाजी सावंत कधीच भिकारी होणार नाहीत. कारण ते फक्त स्वतःचाच विचार करतात. महाराष्ट्रातल्या रुग्णालयांमध्ये गेलेल्या मृतांचा विचार करत नाहीत, असे वक्तव्य रोहित पवारांनी केले. तानाजी सावंत यांच्यावर टीका करताना आपण महाराष्ट्राला भिकारी म्हणत आहोत, याचे भानही रोहित पवारांना उरले नाही.
नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर च्या सरकारी रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाले तो आकडा शेकडे मध्ये पोहोचला पण ही रुग्णालय नेमकी कोणाच्या नियंत्रणाखाली आहेत??, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या की आरोग्य मंत्रालयाच्या?? यावर वाद झाला. त्यामुळे त्या मृत्यूसंदर्भात जबाबदारी निश्चितच करता आली नाही.
या पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्यावर टीका केली पण टीका करताना भाषेचे भान मात्र त्यांना उरले नाही. ते त्या टीकेदरम्यानच महाराष्ट्रालाच भिकारी म्हणून बसले. एकवेळ अख्खा महाराष्ट्र भिकारी होईल, पण तानाजी सावंत कधी भिकारी होणार नाहीत. कारण ते स्वार्थी विचार करत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला.
त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक हे नेमके कोणत्या गटात आहेत?? अजित पवारांच्या की शरद पवारांच्या??, या विषयावर मात्र बोलण्याचे रोहित पवार यांनी टाळले. नवाब मलिक हे अजित पवार गटात गेल्याच्या बातम्या आल्या आहेत. दीड वर्षानंतर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर सध्या ते घरी विश्रांती घेत आहेत आणि माध्यमांपासून दूर राहत आहेत. त्यामुळे नवाब मलिकांच्या गटासंदर्भात अधिकृत खुलासा होऊ शकलेला नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App