विशेष प्रतिनिधी
मुंबई : Uddhav Thackeray महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने बंडखोरांवर मोठी कारवाई केली आहे. बंडखोरांवर कारवाई करताना उद्धव ठाकरे यांनी पक्षविरोधी कारवायांमुळे पाच नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. त्यात भिवंडीचे माजी आमदार रुपेश म्हात्रे, विश्वास नांदेकर, चंद्रकांत घुगुल, संजय आवारी, प्रसाद ठाकरे यांचा समावेश आहे.Uddhav Thackeray
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे भिवंडी लोकसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख रुपेश म्हात्रे यांची पक्षविरोधी कारवायांमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. रूपेश म्हात्रे यांनी भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. तसेच पक्षविरोधी वक्तव्ये आणि कारवायांमुळे त्यांची हकालपट्टी करण्यात आली. मात्र, दुसरीकडे त्यांनी अर्ज मागे घेतला होता.
मध्यवर्ती कार्यालयाने दिली माहिती
याशिवाय वणी विधानसभा जिल्हाप्रमुख विश्वास नांदेक, झरी तालुकाप्रमुख चंद्रकांत घुगुल, मारेगाव तालुकाप्रमुख संजय आवारी, यवतमाळ जिल्हा वणी तालुकाप्रमुख प्रसाद ठाकरे यांचीही पक्षविरोधी कारवायांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. अशी माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाने दिली आहे.
उद्धव ठाकरेंनी बंडखोरांना दिला होता अल्टिमेटम
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा कालचा शेवटचा दिवस होता. शिवसेना ठाकरे गटासह आघाडीतील इतर मित्रपक्षांमध्ये असे अनेक नेते होते ज्यांनी बंडखोर म्हणून अपक्ष अर्ज भरले होते. अशा परिस्थितीत आघाडीचे प्रमुख नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या बंडखोर नेत्यांना शेवटची संधी देत अल्टिमेटम दिला होता. वेळेत नावे मागे न घेतल्यास पक्षातर्फे कडक कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले होते. दरम्यान, अनेक नेत्यांनी आपली नावे मागे घेतली होती, मात्र अनेकजण आपल्या निर्णयावर ठाम राहिले. आता उद्धव ठाकरेंच्या पक्षाने या नेत्यांवर कारवाई केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App