विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : Mahayuti महायुतीने आज कोल्हापुरातून प्रचाराचा नारळ फोडला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीचा दहा कलमी जाहीरनामा देखील सादर केला आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, या सभेने महाराष्ट्रातल्या इतिहासातील नवा अध्याय लिहिला जाणार आहे. 1995 मध्ये युतीचा प्रचाराचा पहिला नारळ हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी कोल्हापूरमध्ये फोडला, आई आंबाबाईच्या आशीर्वादाने. 2014 साली देखील प्रचाराचा श्रीगणेशा इथूनच झाला आणि इतिहास घडला. 2024 साली देखील याच करवीरनगरीमधून प्रचाराची सुरुवात होत आहे.Mahayuti
महायुती जाहीरनामामधील 10 कलमे
1. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचे जाहीर करत आहोत. महिला सुरक्षेसाठी 25000 हजार महिलांना पोलिस दलात भरती करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.
2. शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्राच्या तिजोरीवर पहिला हक्क शेतकऱ्याचा आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करत आहोत तसेच शेतकरी सन्मान योजना जी आहे पंतप्रधानांची त्याचे 6000 आणि आपले 6000, एकूण 12 हजार जी आहे, ती 12 हजार वर्षाला 15 हजार करण्याचा निर्णय घेतला आहे. एमएसपीवर 20 टक्के अनुदान देण्याचा देखील निर्णय घेण्यात आला आहे
3. या राज्यात कोणीही उपाशी झोपणार नाही. प्रत्येकाला अन्न आणि निवारा देण्याचे वचन आम्ही देत आहोत.
4. वृद्ध पेन्शनदार कामना योजना 1500 वरून 2100 रुपये देण्याचे वचन आम्ही देत आहोत.
5. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
6. 25 लाख रोजगार निर्मिती, 10 लाख विद्यार्थ्यांना विद्यावेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
7. 45 हजार गावात पांदण रस्ते बांधणार
8. अंगणवाडी आणि आशा सेविकांना 15 हजार रुपये आणि विमा सुरक्षाकवच देण्याचा निर्णय घेतला आहे.
9. वीजबिलात 30 टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात सौर आणि अक्षय उर्जेवर भर देणार आहोत.
10. व्हीजन महाराष्ट्र 2029 हे 100 दिवसांच्या आत सादर करण्याचे वचन या 10 कलमी कार्यक्रमात आहे.
दरम्यान, यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी देखील महाविकास आघाडीवर तसेच उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोल्हापूर उत्तरेतून पंजा गायब आणि पश्चिमेतून देखील करायचा आहे. महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी पुन्हा आशीर्वाद मिळू दे. कोल्हापुरातून सुरुवात केली की विजय मिळतोच मिळतो. उद्धव ठाकरे या ठिकाणी आले होते. ते म्हणाले की महाराजांचा इंग्रजांवर राग होता म्हणून सुरत लुटली. तुम्हाला आता औरंगजेबाचं नाव घ्यायला लाज वाटू लागली. हिंदुहृदयसम्राट नाव बाळासाहेबांच्या नावापुढचे काढून टाकले, अशी खोचक टीका फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App