सध्या सर्वजण न्यायालयीन कोठडीत आहेत, जाणून घ्या काय आहे प्रकरण? UAPA will be imposed on those 6 people who entered the Parliament the Lt Governor gave permission
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : संसदेच्या सुरक्षेचा भंग करणाऱ्या सहा जणांवर बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा (UAPA) अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी यासाठी दिल्ली पोलिसांना परवानगी दिली आहे. हे लोक उच्च सुरक्षेला बगल देत संसदेच्या आत पोहोचले आणि संसदेच्या कामकाजादरम्यान गॅलरीतून सभागृहात उडी मारली. त्यानंतर सभागृहात धूरही सोडला यामुळे एकच गोंधळ उडाला होता. यानंतर त्या 6 जणांना अटक करण्यात आली.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहाही आरोपी एकमेकांना ओळखत होते आणि ते गुरुग्रामच्या सेक्टर 7 मधील हाउसिंग बोर्ड कॉलनीत एकत्र राहत होते. घटनेच्या दिवशी म्हणजे 13 डिसेंबरला यातील दोघांनी लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून खासदार बसलेल्या ठिकाणी उडी मारली.
त्यावेळी सभागृहाचे कामकाज सुरू होते, त्यामुळे एक व्हिडिओ समोर आला होता ज्यामध्ये एक व्यक्ती टेबलावर उडी मारून पुढे जात आहे. पोलिसांनी मनोरंजन डी, सागर शर्मा, अमोल धनराज शिंदे, नीलम रानोलिया, ललित झा आणि महेश कुमावत या सहा जणांना अटक केली. बेकायदेशीरपणे संसदेत प्रवेश केल्याचा आणि लोकसभेत थेट सत्रादरम्यान धुर निर्माण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
तपासानंतर दिल्ली पोलिसांनी त्यांच्यावर यूएपीए लादण्यासाठी उपराज्यपालांकडे परवानगी मागितली होती. आता मंजुरी मिळाल्यानंतर त्यांच्यावर यूएपीए अंतर्गत कारवाई केली जाईल. पोलिसांनी सांगितले की, तपासात सर्वांचा सहभाग आढळून आला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. सध्या सर्वजण न्यायालयीन कोठडीत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App