वृत्तसंस्था
पॅरिस : फ्रेंच स्टार जलतरणपटू यानिक अॅग्नेलवर १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. मेलहाऊस अभियोक्ता कार्यालयाने सांगितले की, जलतरणपटू यानिक विरुद्ध शनिवारी (11 डिसेंबर) तपास सुरू झाला. यानिक हा दोन वेळचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता आहे. 2012च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये त्याने दोन्ही पदके जिंकली होती. Two-time Olympic gold medalist swimmer Yannick Agnel accused of rape, sexually assaulted a 15-year-old minor
शहराचे सरकारी वकील एडविग रॉक्स-मॉरीजोट म्हणाले की, 29 वर्षीय जलतरणपटूला न्यायालयीन देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. यानिकला गुरुवारी (9 डिसेंबर) पॅरिसमध्ये अटक करण्यात आली. येथून त्याला पोलिस कोठडीत पूर्व फ्रान्समधील मेलहाऊस शहरात आणण्यात आले.
फिर्यादीने सांगितले की, तक्रारीनुसार हे प्रकरण 2016 चे आहे. यामध्ये १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. त्याच वेळी, यानिकने 2014 मध्ये मेलहाउस स्विमिंग क्लबमध्ये प्रवेश केला. येथे त्याने 2 वर्षे प्रशिक्षण घेतले. यापूर्वी त्याने २०१२च्या ऑलिम्पिकमध्ये दोन सुवर्णपदके जिंकली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, याप्रकरणी अनेक जलतरणपटू आणि माजी जलतरणपटूंची चौकशी करण्यात आली आहे.
यानिकने 2010च्या युरोपियन चॅम्पियनशिपमधून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्यानंतर 400 मीटर फ्रीस्टाइलमध्ये सुवर्णपदक जिंकले. यासह तो फ्रान्सचा आणि चॅम्पियनशिपचा नवा विक्रमधारक बनला. दोन वर्षांनंतर, त्याने लंडन ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला, ज्यामध्ये त्याने 200 मीटर आणि 4×100 मीटर फ्रीस्टाइलमध्ये सुवर्ण जिंकले. तसेच 4×200 फ्रीस्टाइलमध्ये रौप्य पदक जिंकले. याशिवाय 2013 च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्येही त्याने दोन सुवर्णपदके जिंकली होती.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App