मोहम्मद युनूस यांना सोपवली महत्त्वाची खाती
विशेष प्रतिनिधी
ढाका : बांगलादेशमध्ये ( Bangladesh ) काही काळापासून सुरू असलेल्या हिंसाचार आणि अराजकतेच्या पार्श्वभूमीवर देशात सत्तापरिवर्तन झाले आहे. शेख हसीना ( Sheikh Hasina )यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर आणि देश सोडल्यानंतर नोबेल विजेते प्राध्यापक मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतिरम सरकार स्थापन करण्यात आले आहे.
तर मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारमध्ये 16 सदस्यीय सल्लागार समितीची घोषणा करण्यात आली आहे. विविध क्षेत्रातून लोकांची निवड करण्यात आली आहे. मात्र युनूस मंत्रिमंडळात दोन नावांनी सर्वाधिक लक्ष वेधले आहे. नाहिद इस्लाम आणि आसिफ महमूद अशी ही नावे आहेत. नाहीद इस्लाम आणि आसिफ मेहमूद हे विद्यार्थी नेते आहेत. दोघेही अलीकडील विद्यार्थी आंदोलनाचे नेतृत्व करत होते, ज्यामुळे शेख हसीना यांना पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन देश सोडावा लागला.
देशभरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या ‘स्टुडंट्स अगेन्स्ट डिस्क्रिमिनेशन’ या गटातील आसिफ आणि नाहीद यांचा नव्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. नाहिद इस्लाम यांची देशाच्या दूरसंचार मंत्रालयाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नाहिद इस्लाम, 26 वर्षीय समाजशास्त्र पदवीधर, विद्यार्थी आंदोलनाचा नेता होता आणि त्याला पोलिसांनी अटक देखील केली होती.
तर, आसिफ महमूद यांच्याकडे युवा आणि क्रीडा मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. २५ वर्षीय आसिफ हा भाषाशास्त्रात पदवीधर आहे. आसिफ आणि नाहिद इस्लाम हे विद्यार्थी चळवळीचे सर्वात महत्त्वाचे चेहरे होते, ज्यासाठी त्यांना नवीन सरकारमध्ये पुरस्कृत करण्यात आले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App