Pawar, Chavan and Patil : पवारांच्या 225 आकड्याला पृथ्वीराज बाबा + जयंत पाटलांचा खोडा; दोघांनी आकडा खाली आणला!!

pawar, chavan and patil

विशेष प्रतिनिधी

मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा परफॉर्मन्स महायुतीपेक्षा चांगला झाल्यावर आघाडीच्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये हवा भरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदश्चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवारांनी विधानसभेला महाविकास आघाडी एकदम 225 जागा जिंकणार असल्याचा आकडा सांगितला होता. त्यामुळे महाविकास आघाडीतल्या नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा हॉट बलून फारच उंचावर गेला होता. Contradiction among pawar, chavan and patil over victory numbers of MVA

पण आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या 225 आकड्याच्या हॉट बलूनची हवा बरीच कमी केल्याचे दिसत आहे. कारण विधानसभा निवडणुका प्रत्यक्षात जाहीर होण्यापूर्वी पृथ्वीराज बाबा आणि जयंत पाटलांनी महाविकास आघाडी जिंकण्याचा आकडा बराच खाली आणून ठेवला आहे.

पवारांनी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये 225 चा आकडा सांगितला होता. पण पृथ्वीराज चव्हाण यांनी आज लोकसभा निवडणुकीच्या परफॉर्मन्सच्या टक्केवारीनुसार नेमका आकडा सांगितला. पण पवारांनी सांगितलेल्या आकड्यापेक्षा तो फारच कमी भरला. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने 48 पैकी 31 जागा जिंकल्या. याचा अर्थ 65 % जागा जिंकल्या. त्या हिशेबाने विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 288 पैकी 183 जागा मिळतील, असे गणित पृथ्वीराज बाबांनी मांडले.

पवारांचा 225 चा आकडा पृथ्वीराज चव्हाण यांनी 183 वर आणला. पण पवारांच्याच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे तर 183 आकड्यापेक्षाही खाली आले. शिवस्वराज्य यात्रेच्या पहिल्या दिवशी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जुन्नर आणि मंचर मध्ये मेळावे झाले. या दोन्ही मेळाव्यांमध्ये जयंत पाटलांनी महाविकास आघाडी 170 जागा जिंकेल, असे जाहीर करून टाकले. त्यातून त्यांनी पवारांचाच नाही, तर पृथ्वीराज बाबांनी सांगितलेला आकडाही आणखी खाली आणला. त्यामुळे महाविकास आघाडीतल्या घटत चाललेल्या आत्मविश्वासाचा आरसा दिसला.

Contradiction among pawar, chavan and patil over victory numbers of MVA

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात