1 लाख मराठा उद्योजकांना शिंदे – फडणवीस सरकारचे 8.5 हजार कोटींचे कर्जवाटप!!; साताऱ्यात लाभार्थी मेळावा


विशेष प्रतिनिधी

सातारा : महाराष्ट्रातल्या 1 लाख मराठा उद्योजक संकल्पपूर्तीनिमित्त, स्व. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. मार्फत आयोजित लाभार्थी मेळाव्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सहभागी झाले. यावेळी उपविभागीय अधिकारी (महसूल) कार्यालयाचे त्यांनी ऑनलाइन पद्धतीने भूमिपूजन केले. 1 lakh Maratha entrepreneurs Loan distribution

 देवेंद्र फडणवीस म्हणाले :

नोकरी मागणारे नाहीत, तर नोकरी देणारे हात मराठा समाजामध्ये तयार झाले पाहिजेत आणि याचदृष्टीने आम्ही स्व.अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची पुनर्रचना केली. स्व. अण्णासाहेब पाटील यांचे सुपुत्र, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आणि श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या संकल्पनेतून मराठा समाजात 1 लाख उद्योजक तयार झाले. महामंडळाच्या माध्यमातून ₹8.5 हजार कोटींचे कर्ज मराठा तरूणांना मिळाले. त्याचे व्याज महामंडळ भरते आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने या कर्जवाटपात महत्त्वाची भूमिका बजावली.

“सारथी” सारखी संस्था आपण तयार केली, गरीब शेतकऱ्याचा मुलगा कोचिंग क्लासेसची फी भरु शकत नाही, सारथीच्या माध्यमातून त्यांना हे दालन उपलब्ध करुन दिले. “सारथी” होती म्हणून आम्ही घडलो असे म्हणणारे आयएएस, डीवायएसपी पाहतो तेव्हा मनापासून आनंद वाटतो.

खासगी महाविद्यालयामध्ये 507 कोर्सेसमध्ये आमच्या मराठा तरुण-तरुणींची फी भरण्याचा निर्णय राज्य सरकारने केला, त्यासाठी ₹1600 कोटी द्यायला सुरुवात केली. मुलींकरता मोफत शिक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. श्रीमंत छत्रपती आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मागणी केल्याप्रमाणे सातारा येथे मराठा समाजातील तरुणांसाठी वसतिगृह उभे करुन दिले जाईल.

मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे म्हणूनच आमच्या सरकारने 10% आरक्षण दिले. आम्ही ते टिकवून ठेवणारच आहोत. 17 हजार पदांसाठी पोलीस भरती झाली त्यामध्ये 10 टक्क्यांपेक्षा जास्त मराठा तरुणांना जागा मिळाली आहे. इतिहास शिव्याशापांना लक्षात ठेवत नाही, कर्तृत्वाला लक्षात ठेवतो. जेव्हा योजनांचे मूल्यमापन होईल तेव्हा मराठा समाजासाठी केलेले हे कार्य लक्षात ठेवले जाईल.

यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, मंत्री शंभूराजे देसाई, श्रीमंत छत्रपती आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. महेश शिंदे, आ. जयकुमार गोरे, माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

1 lakh Maratha entrepreneurs Loan distribution

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात