खळबळजनक : मुंबईमधील विरारमध्ये दोन फ्लॅट चक्क १५० खरेदीदारांना विकले!

Postal service officer sold secrets to pak spy in honey trap, arrested

३० कोटींहून अधिक रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी बंगळुरूच्या बिल्डरला अटक!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : विरारमध्ये निवासी प्रकल्प असलेल्या बंगळुरू येथील एका बिल्डरला दोन फ्लॅट तब्बल १५० खरेदीदारांना विकून त्यांची ३० कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. याशिवाय तिसरा फ्लॅटही अशाच प्रकारे विकला गेला आहे का?, याचा तपास करत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. Two flats sold to 150 buyers in Virar in Mumbai Bangalore builder arrested

याप्रकरणी मंदार हाऊसिंग प्रायव्हेट लिमिटेडचा संचालक राजू सुलिरे याला मीरा भाईंदर वसई विरार (MBVV) आयुक्तालयाच्या क्राईम युनिट 3 ने बेंगळुरू येथून अटक केली आहे. तसेच, त्याचे साथीदार अविनाश ढोले, विपुल पाटील, अल्लाउद्दीन शेख, युसूफ खोतवाला आदी फरार आहेत. कंपनीचे विरार आणि नालासोपारा येथे निवासी प्रकल्प आहेत.

2011 ते 2018 दरम्यान 150 हून अधिक ग्राहकांची फसवणूक झाली. या फसवणुकीच्या तक्रारी विरार (पश्चिम) येथील अर्नाळा पोलिसात दाखल करण्यात आल्या होत्या.

बाजारभावापेक्षा कमी किमतीत सदनिका देण्याचा दावा आरोपींनी केला होता. आरोपींनी संभाव्य खरेदीदारांना फ्लॅट दाखवले आणि विक्रीचे करारही केले. एक फ्लॅट अनेक खरेदीदारांना विकल्याचे तपासात समोर आले आहे. सदनिकांचा ताबा देण्यास विलंब झाल्यास व्याज देण्याचे आश्वासन देऊन ग्राहकांना विश्वासात संपादन केला होता.

Two flats sold to 150 buyers in Virar in Mumbai Bangalore builder arrested

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात