विशेष प्रतिनिधी
कोलकाता : पश्चिम बंगाल मधल्या डायमंड हार्बर स्थित फाल्टा विधानसभा मतदारसंघात तृणमूल काँग्रेसचा उमेदवार जहांगीर खान याने आधी दादागिरी केलीच होती. पण आज 11 बुथ वरील फेरमतदानाच्या वेळी सुद्धा त्याच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना दमदाटी केली. त्यामुळे त्या मतदारसंघातल्या हिंदू मतदारांनी रस्त्यावर उतरून जहांगीर खान आणि त्याच्या कार्यकर्त्यांच्या विरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. तिथे केंद्रीय सुरक्षा दलांना तैनातीसाठी बोलविणे भाग पाडले. Trinamool’s Jehangir Khan’s bullying again in West Bengal’s Falta constituency; Voters were harassed even during re-voting
फाल्टा मतदारसंघातील काँग्रेसचा उमेदवार जहांगीर खान याच्या दादागिरी विरुद्ध आयपीएस अधिकारी अजय पाल शर्मा यांनी कठोर इशारा दिला होता. त्यानंतर जहांगीर खान याने खेला तुमने शुरू किया है, खतम हम करेंगे अशी उलटी दमबाजी केली होती. त्यानंतर तिथल्या मतदारसंघांमध्ये मतदान पार पडले, पण त्या मतदानाच्या वेळी प्रचंड गोंधळ झाला. जहांगीर यांच्या कार्यकर्त्यांनी सहकारी अधिकाऱ्यांसमोर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन वरील भाजपच्या उमेदवाराच्या नावासमोर चिकटपट्ट्या लावून ते बंद केले होते. त्यामुळे भाजपच्या उमेदवाराला मतदानाच झाले नाही.
#WATCH | West Bengal Elections 2026 | South 24 Parganas: Locals have a heated argument with security personnel in Falta area. They are alleging that TMC leaders are threatening them. pic.twitter.com/tZkariNAwo — ANI (@ANI) May 2, 2026
#WATCH | West Bengal Elections 2026 | South 24 Parganas: Locals have a heated argument with security personnel in Falta area. They are alleging that TMC leaders are threatening them. pic.twitter.com/tZkariNAwo
— ANI (@ANI) May 2, 2026
निवडणूक आयोगाने या सगळ्या गैरप्रकाराची दखल घेऊन तब्बल 11 बूथ वर फेरमतदान घ्यायचे आदेश दिले. त्यानुसार, आज मतदान सुरू झाले. परंतु काही वेळातच तृणमूळ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दमदाटी सुरू केली. जहांगीर खानचे कार्यकर्ते बुध और पोहोचले. त्यांनी मतदारांना दमदाटी करून मारहाण केली. त्यामुळे मतदारांनी संतप्त होऊन केंद्रीय पोलीस यंत्रणांकडे भरपूर तक्रारी केल्या. बुथवर केंद्रीय पोलीस यंत्रणा तैनात झाली. तरीसुद्धा संतप्त मतदारांचा संताप आवरणे कठीण झाले होते. केंद्रीय पोलिस यंत्रणांनी हस्तक्षेप करून मतदान व्यवस्थित सुरू ठेवले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App