विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आसाममध्ये ८०० चहामळे असून तेथे लसीकरणाची मोहीम खूपच संथगतीने सुरू आहे. त्यामुळे चहामळ्यात कोरोना संसर्ग वाढीचे प्रमाण सुमारे ३०० टक्क्याहून अधिक राहिल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. Tree estate become corona centers in Assam
राज्यातील चहामळ्यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे २५ लाख लोक कार्यरत आहेत. एवढी प्रचंड संख्या असूनही लसीकरणाचा वेग खूपच कमी आहे. या भागात लसीकरण मोहीम युद्धपातळीवर राबवल्यास कोरोनाचा प्रसार होणार नाही. आसाममध्ये ६ लाख प्रत्यक्ष मजुर असून त्यापैकी ४४ हजार जणांना पहिला डोस मिळाला तर ३ हजार जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
याशिवाय कोविड केअर सेंटरची संख्या देखील अपुरी आहे. ३७० चहामळ्यात कोरोनाचा शिरकाव झाला असून त्यापैकी २७१ ठिकाणी कोविड केअर सेंटरची उभारणी केल्याचा राज्य सरकारच्या आरोग्य खात्याने दावा केला आहे.
३१ मे पर्यंत राज्यातील ३७० चहामळ्यात काम करणाऱ्या ६,१४६ मजुरांना कोरोनाची लागण झाली तर ४३ जणांचा मृत्यू झाला. १९ मेपर्यंत एकूण १८५१ जणांना लागण झाली होती तर २२० चहामळ्यातील १४ जणांचा मृत्यू झाला आहे.
चहामळ्यातील मजुर शिक्षित आणि सजग नसल्याने ते अत्यल्प वेतनावर काम करतात. सरासरी महिनाकाठी ७ हजार रुपये वेतनावर काम करतात. राज्यातील एकूण लोकसंख्येच्या १८ टक्के असलेल्या मजुरांवर अस्वच्छतेमुळे कोरोना संकटाची टांगती तलवार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App