बाबा रामदेवांच्या कोरोननिलबाबत फेक न्यूज, नेपाळने बंदी घातली नसल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट


योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीच्या कोरोनिलबाबत फेक न्यूज पसरविण्यात आली आहे. नेपाळ सरकारने कोरोनिलच्या वितरणावर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याची अफवा पसरविण्यात आली आहे. नेपाळ सरकारने कोरोनिलच्या वितरणावर बंदी घातली नसल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.Fake news about Baba Ramdev’s coronal, Nepal does not ban


विशेष प्रतिनिधी

काठमांडू : योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीच्या कोरोनिलबाबत फेक न्यूज पसरविण्यात आली आहे. नेपाळ सरकारने कोरोनिलच्या वितरणावर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याची अफवा पसरविण्यात आली आहे. नेपाळ सरकारने कोरोनिलच्या वितरणावर बंदी घातली नसल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

योगगुरू बाबा रामदेव यांनी गेल्या वर्षी २३ जून रोजी कोरोनाची साथ शिखरावर असताना कोरोनिल हे औषध बाजारात आणले होते. यावरून भारतातही वाद झाला होता. यानंतर शेजारील देश नेपाळ आणि भूतान येथेही कोरोनिल पाठविण्यात आले आहे. कोरोनिल औषध कोरोना विषाणूच्या संसर्गाविरोधात प्रभावी असल्याचा ठोस पुरावा नसल्याने बंदी घातल्याचे वृत्त पसरले.



मात्र, नेपाळ आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते डॉ. कृष्णप्रसाद पोउड्याल यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. ते म्हणाले, नेपाळ सरकारने कोरोनिलवर बंदी घातल्याची कोणतेही अधिकृत आदेश काढलेले नाहीत.

सार्वजनिकरित्या वितरित होणाऱ्या कोणत्याही औषधाला ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशन विभागाकडून परवानगी घ्यावी लागते. नेपाळचे आरोग्य मंत्रालयाने ह्रदयेश त्रिपाठी यांना नुकतेच कोरोनिलचे पॅकेट भेट देण्यात आले होते. त्याशिवाय मला काहीही माहिती नाही.

कोरोनावर गुणकारी असलेली अनेक आयुर्वेदिक औषधे नेपाळमध्येही आहेत. त्यांच्यामुळे माणसाची प्रतिकारशक्ती वाढते आणि संसर्गाचा धोका कमी होतो. मात्र, त्यांना जागतिक आरोग्य संघटनेने अद्याप मान्यता दिली नसल्याचे त्यांनी सांगितले.

Fake news about Baba Ramdev’s coronal, Nepal does not ban

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात