संत्र्याच्या बागेमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार , मध्य प्रदेशातील धक्कादायक घटना ; फांद्यांना सलाईनच्या बाटल्या लटकवून रुग्णांना ग्लुकोज

वृत्तसंस्था

भोपाळ : संत्र्याच्या बागेमध्ये एका बनावट डॉक्टरने कोरोना रुग्णांवर उपचार केल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशमधील आगर मालवा जिल्ह्यात उघडकीस आली आहे. Treatment of corona patients in the orange orchard

एका बनावट डॉक्टरने बागेतील झाडांच्या फांद्यांना सलाईन लटकवून तो महिला रुग्णांना ग्लुकोजही देत होता. यासंदर्भातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अधिकारी घटनास्थळी पोचले. तेव्हा तो डॉक्टर पळून गेला.

बागेतील झाडाखाली कार्डबोर्डची अंथरुण करुन त्यावर महिलांना झोपवले होते. झाडाच्या फांद्यांना लटकवलेल्या सलाईन बाटल्यातून ग्लुकोज देण्यात येत असल्याचं अधिकाऱ्यांना दिसले. तसेच सीरिंज आणि औषधांची अर्धवट जळालेली बिलंही सापडली.



कोरोनाची चाचणी करून रुग्णालयात दाखल करतील अशी भीती ग्रामीण भागातील जनतेला आहे. त्यामुळेच ग्रामीण भागात बनावट डॉक्टरांचे फावले आहे. अशा डॉक्टरकडून उपचार नागरिक करत आहेत.

दरम्यान, अशा डॉक्टरांवर कारवाई केली जात असून रुग्ण जरी आले तर त्यांना सरकारी रुग्णालयात पाठवून द्यावे, असे आवाहन अधिकाऱ्यानी केले.

Treatment of corona patients in the orange orchard

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात