Independence Day – 2023 : जागतिक आर्थिक विकासासाठी आज जगाच्या नजरा भारतावर खिळल्या आहेत : राष्ट्रपती


आमच्या अन्नदाता शेतकर्‍यांनी आर्थिक विकासात मोलाचे योगदान दिले आहे, राष्ट्र त्याचे ऋणी आहे. असेही राष्ट्रपीत मुर्मू यांनी म्हटले आहे.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : ७७ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशवासियांना हार्दिक शुभेच्छा देताना राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, आज जागतिक आर्थिक विकासासाठी जगाच्या नजरा भारतावर खिळल्या आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला संबोधित करताना राष्ट्रपतींनी विविध मुद्य्यावर भाष्य केले.  Today the eyes of the world are on India for global economic development President

राष्ट्रपतींनी म्हटले की, “जगातील बहुतांश अर्थव्यवस्था गंभीर टप्प्यातून जात आहेत. जागतिक महामारीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटातून जागतिक समुदाय पूर्णपणे बाहेर पडू शकला नाही की, आंतरराष्ट्रीय स्तरावर घडणाऱ्या घटनांमुळे अनिश्चिततेचे वातावरण अधिक गंभीर बनले आहे. असे असले तरी, सरकारला कठीण परिस्थितीचा चांगल्या प्रकारे सामना करण्यात यश आले आहे. देशाने आव्हानांचे संधींमध्ये रूपांतर केले आहे आणि प्रभावी आर्थिक विकास दर देखील नोंदविला आहे. आमच्या अन्नदाता शेतकर्‍यांनी आमच्या आर्थिक विकासात मोलाचे योगदान दिले आहे. राष्ट्र त्यांचे ऋणी आहे.

जागतिक स्तरावर, महागाई हा चिंतेचा विषय आहे, परंतु सरकार आणि रिझर्व्ह बँक याला आटोक्यात आणण्यात यशस्वी झाले आहेत, असे राष्ट्रपती म्हणाल्या. तसेच, सरकारने महागाईचा सर्वसामान्यांवर फारसा परिणाम होऊ दिला नाही आणि त्याचवेळी गरिबांना सर्वसमावेशक सुरक्षा कवच दिले आहे.

आज जागतिक आर्थिक विकासासाठी जगाच्या नजरा भारतावर खिळल्या आहेत. आज भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. जगातील सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था म्हणून, भारत बनण्याच्या तयारीत आहे. आपल्या आर्थिक प्रगतीच्या या प्रवासात सर्वसमावेशक विकासावर भर दिला जात आहे. असेही राष्ट्रपतींनी म्हटले.

Today the eyes of the world are on India for global economic development President

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात