Independence Day 2023 : स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींचे ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून देशाला दहाव्यांदा संबोधन, म्हणाले…


मणिपूरमधील हिंसाचाराचाही केला आहे उल्लेख,जाणून घ्या आणखी काय म्हणाले.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : 77 व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केली. यानंतर लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींचे  भाषण सुरू झाले. पंतप्रधान मोदी स्वातंत्र्यदिना निमित्त देशाला लाल किल्ल्यावरून दहाव्यांदा संबोधित करत आहेत.  मोदी म्हणाले, जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि आता लोकसंख्येच्या बाबतीतही भारत आघाडीचा देश आहे. एवढा मोठा देश, माझ्या कुटुंबातील 140 कोटी सदस्य आज स्वातंत्र्यदिन साजरा करत आहेत. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणाऱ्या सर्व शूरवीरांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. Independence Day 2023 On Independence Day Prime Minister Modi addressed the nation for the tenth time from the historic Red Fort

मोदी म्हणाले, मणिपूरमध्ये मागील काही दिवसांमध्ये हिंसाचार झाला होता. मात्र काही दिवसांपासून तेथून सातत्याने शांततेच्या बातम्या येत आहेत. देश मणिपूरच्या जनतेसोबत आहे. लोकांनी शांततेचा उत्सव पुढे न्यावा. शांततेनेच यातून मार्ग निघेल. केंद्र आणि राज्य सरकार मणिपूरमध्ये शांतता राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत आणि करत राहतील.

पंतप्रधान मोदी म्हणाले, यावेळी नैसर्गिक आपत्तीने देशाच्या अनेक भागांमध्ये अकल्पनीय संकट निर्माण केले आहे. याचा सामना करणाऱ्या सर्व कुटुंबांप्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. राज्य-केंद्र सरकार मिळून त्या सर्व समस्यांपासून मुक्ती मिळवून जलद विकासाकडे वाटचाल करेल, अशी ग्वाही मी देतो.

आज देशातील तरुणांना जेवढे भाग्य लाभले आहे तेवढे भाग्य क्वचितच कुणाला मिळते. आपण ते गमावू नये. येणारा काळ हा तंत्रज्ञानाच्या प्रभावाचा असणार आहे. आपली छोटी शहरे लोकसंख्येच्या दृष्टीने लहान असतील पण त्यांची क्षमता कमी नाही. देशात संधींची कमतरता नाही. आपल्याला पाहिजे तितक्या संधी देण्याची क्षमता या देशामध्ये आहे.

Independence Day 2023 On Independence Day Prime Minister Modi addressed the nation for the tenth time from the historic Red Fort

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात विठ्ठल रखुमाईला शोभुनी दिसतो तिरंगा!