वाघांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर, बांधवगड अभयारण्यामध्ये वाघिणीची शिकार


विशेष प्रतिनिधी

भोपाळ – एकीकडे वाघांच्या संवर्धनासाठी सरकार कसोशीने प्रयत्न करीत असताना त्यांची शिकार होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. मध्य प्रदेशात एका वाघीणीला ठार मारल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे वाघांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. Tigress killed in Bandhagadh

मध्य प्रदेशातील उमरिया जिल्ह्यात बांधवगड व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये वाघीण विहीरमध्ये मृतावस्थेत आढळली. तिच्या शरीरावर दोन मोठे दगड बांधून तिला विहीरीत फेकण्यात आले.



वाघिणीच्या चेहऱ्यावर दोन जखमा आढळल्याने तिची शिकार केल्याचा संशय व्यक्त होत आहे. कुऱ्हाडीसारख्या धारदार हत्याराने वाघिणीवर वार केल्याचा संशय वनखात्याने व्यक्त केला. वाघिणीच्या मृत्यूची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचेही वनखात्याने जाहीर केले.

आशियाई पट्टेरी वाघ हे भारतीय समृद्ध जंगलाचे प्रतीक मानले जाते. ज्या जंगलात वाघ आहे तेथील जंगल परिपूर्ण मानले जाते. मात्र केवळ काही लाखांसाठी वाघांची शिकार केली जाते. वाघांची नखे, कातडी तसच अन्य काही अवयवांना मोठी मागमी असल्याने त्यांची चोरट्या पद्धतीने शिकार करून विक्री कली जाते.

Tigress killed in Bandhagadh

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात